उसनवारीचे पैसे मागीतल्याने तरुणावर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 17:43 IST2019-07-06T17:43:29+5:302019-07-06T17:43:44+5:30
इगतपुरी : उसनवार पैसे मागीतल्यावरून इगतपुरी शहरातील मुख्य बाजारपेठेत एका तरु णावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला असून,तरु णाच्या उजव्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.

उसनवारीचे पैसे मागीतल्याने तरुणावर गोळीबार
इगतपुरी : उसनवार पैसे मागीतल्यावरून इगतपुरी शहरातील मुख्य बाजारपेठेत एका तरु णावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला असून,तरु णाच्या उजव्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.गोळीबार करणारा संशयित आरोपी सचिन म्हसणे पलायन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी शहरातील सनी भगीरथ डावखर (१९) रा. गिरणारे व सचिन सुभाष म्हसणे (२५) रा.फागुंळगव्हाण यांच्यात पैश्यांच्या व्यवहारातून शुक्र वारी (दि.५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास इगतपुरी शहरातील मुख्य बाजार पेठेत वाद निर्माण झाला. यात फिर्यादी सनी डावखर याने संशयित म्हसने याला दिलेल्या ५ हजार रु पयांची मागणी केली. दरम्यान, याचा राग मनात धरून सचिन म्हसने याने जीवे मारण्याच्या हेतूने सनीवर बेकायदेशीर असलेल्या गावठी कट्ट्यातुन गोळीबार केला.यात सनी च्या उजव्या पायावर गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारार्थ इगतपुरी ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन, तपास सुरू केला. यात संशयित आरोपी दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला शिताफीने अटक करण्यात आली असून त्याच्याकडे असलेला कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.