थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 13:33 IST2018-11-30T13:33:11+5:302018-11-30T13:33:19+5:30
त्र्यंबकेश्वर : सध्या त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटताना दिसत आहे. तसे ...

थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार
त्र्यंबकेश्वर : सध्या त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटताना दिसत आहे. तसे पाहता दरवर्षी डिसेंबरपासूनच ख-या अर्थाने थंडी सुरु होत असते. यावर्षी मात्र नोव्हेंबरपासुनच थंडी सुरु झाली आहे. हुडहुडी भरली आहे. यावर्षी पाऊस कमी पडला तरी थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्र्यंबककरांचा आजपर्यंतचा अनुभव असा होता की पाउस जास्त झाला तर थंडीच्या प्रमाणात वाढ होत असते. पण यावर्षी मात्र थंडी वाढली आहे. श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा जानेवारीत असते. यावर्षी मात्र निवृत्तीनाथ यात्रा ३१ जानेवारीला आहे. यात्रेत स्वेटर्स ब्लँकेटची दुकाने येतात. निवृत्तीनाथ यात्रेत स्वेटर्स ब्लँकेट गरम कपडे आदी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. यात्रेत येणारे भाविक व स्थानिक उबदार कपड्यांची खरेदी करतात.