इगतपुरी येथे टेम्पो ट्रॅव्हलरला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:20 IST2019-10-19T00:18:21+5:302019-10-19T00:20:54+5:30
इगतपुरी : येथील महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरने अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना शुक्रवारी (दि. १८) घडली.

इगतपुरी येथे पेटलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान.
लोकमत न्यूज नेटवर्क
इगतपुरी : येथील महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरने अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना शुक्रवारी (दि. १८) घडली.
नाशिककडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच ०४, जीपी ३१३२) कसारा घाट चढून आल्यानंतर महामार्गावर इगतपुरीजवळ एका हॉटेलजवळ बंद पडली. चालक काय झाले हे पाहण्यासाठी खाली उतरला असता त्याने समोरील बोनेटमधून धूर निघू लागल्याचे पाहिले. त्याने तत्काळ प्रवाशांना बाहेर काढले.
आग आटोक्यात आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी फायर आॅफिसर हरीश चौबे, गणेश भागडे, अजय म्हसणे, संजय बºहे, विशाल वालतुले, घोटी टॅबचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, नागेश जाधव आदींनी आगीवर नियंत्रण मिळविले.
गाडीमधील १२ ते १५ प्रवासी सुखरूप बाहेर पडले; मात्र काही क्षणातच गाडीने मोठा पेट घेत आगीने रौद्र रूप धारण केले. घोटी टॅब पोलिसांनी महिंद्रा कंपनी व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल केले.