सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीत आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:01 IST2021-04-06T23:26:04+5:302021-04-07T01:01:08+5:30
सिन्नर: मुसळगाव-गुळवंच भागात असलेल्या रतन इंडिया (इंडिया बुल्स) प्रकल्पात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. प्रकल्पातील वाढलेल्या गवतामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीत ऑईलच्या ड्रमसह इतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती प्रकल्प प्रमुख अभिमन्यू राठोड यांनी दिली. आगीचे कारण समजू शकले नाही.

आगीने धुराचे लोट निघू लागल्यानंतर कामगारांसह अधिकाऱ्यांनी धाव घेतली. प्रकल्पातील दोन अग्निशमन बंब तातडीने हजर झाले. आग भडकू लागल्याने मदतीसाठी नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनाही बोलावण्यात आले. सुरक्षा रक्षक, कारखान्यातील कामगारही मदतीला धावले. सायंकाळी सात वाजता आग आटोक्यात आली.
या आगीत प्रकल्पात असलेले जुने ऑईलचे ड्रम, इलेक्ट्रिक केबल, रंगाचे डबे जळून खाक झाले. कामगार मदतीला धावल्यामुळे ऑफिसच्या दिशेने येणारी आग विझवण्यात आली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी कंपनीचे पथक येणार असून त्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज येऊ शकेल.
फोटो ओळी- सिन्नर येथील इंडियाबुल्स प्रकल्पात लागलेली आग.