कॅनॉलरोडवरील दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:49 IST2019-01-10T01:49:22+5:302019-01-10T01:49:34+5:30

नाशिकरोड : जेलरोड कॅनॉल रोडवरील ढिकलेनगर येथे रस्त्याच्या कडेला असलेले पत्र्याचे मंडप साहित्य गुदाम, इलेक्ट्रिक दुकान व एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Fire at shops on canalorod | कॅनॉलरोडवरील दुकानांना आग

कॅनॉलरोडवरील दुकानांना आग

नाशिकरोड : जेलरोड कॅनॉल रोडवरील ढिकलेनगर येथे रस्त्याच्या कडेला असलेले पत्र्याचे मंडप साहित्य गुदाम, इलेक्ट्रिक दुकान व एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ढिकलेनगर येथे रस्त्याच्या कडेला अरुण बबन ढिकले यांनी पत्र्याची दुकाने थाटली आहेत. त्यामध्ये ढिकले यांचे स्वत:चे जयमल्हार केटरिंग नावाचे दुकान असून त्यामध्ये मंडपाचे साहित्य ठेवण्यात आले होते. शेजारीच दीपक पंडित यांचे साऊंड सिस्टीमचे इलेक्ट्रिक दुकान असून त्याच्या शेजारी नागनारायण पंडित यांचे घर होते. बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने मंडप गुदाम व इलेक्ट्रिक दुकानातील वस्तूंनी पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.

Web Title: Fire at shops on canalorod

टॅग्स :fireआग