शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

Nashik: जुने नाशिकमध्ये दुकानांमध्ये आगडोंब; ५० दुचाकींसह २ घरे बेचिराख, नऊ बंबाच्या साहायाने आगीवर नियंत्रण

By अझहर शेख | Published: April 22, 2024 10:53 AM

Nashik Fire News: जुने नाशिक मधील चौक मंडई येथील नुरी चौकात असलेल्या वाहन बाजार दुकानाला सोमवारी सकाळी (दि.२२) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. क्षणार्धात आग वाऱ्यासारखी पसरल्याने शेजारील भंगरमालाची दोन दुकाने व या पाठीमागे असलेली दोन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

- अझहर शेखनाशिक - जुने नाशिक मधील चौक मंडई येथील नुरी चौकात असलेल्या वाहन बाजार दुकानाला सोमवारी सकाळी (दि.२२) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. क्षणार्धात आग वाऱ्यासारखी पसरल्याने शेजारील भंगरमालाची दोन दुकाने व या पाठीमागे असलेली दोन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाच्या सुमारे २०जवानांनी नऊ बंबाच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी टाळली असली तरी लाखोंच्या घरात आर्थिक नुकसान झाले आहे. 

नुरी चौकामध्ये उमर शेख यांचे महाराष्ट्र वाहन बाजार नावाने दुकान आहे. या दुकानात विक्रीसाठी सुमारे 50पेक्षा जास्त दुचाकी ठेवलेल्या होत्या. आगीची सुरुवात या दुकानातून सकाळी झाली. अग्निशमन दलाचा पहिला बंब शिंगाडा तलाव मुख्यालयातून घटनास्थळी पोहचला तेव्हा हे दुकान पूर्णपणे आगीमध्ये हरविले होते असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. काही वेळेत या दुकानात अगदी लागून असलेल्या प्लॅस्टिक भांगर मालाच्या आदिल शेख यांच्या दुकानाला तसेच शोएब शेख यांचे अशरफी स्पेअर पार्ट नावाने असलेल्या दुकानाला आगीने कवेत घेतले. त्याचवेळी आग या दुकानांच्या पाठीमागे असलेल्या एजाज शेख व खैरुणीसा हनिफ सैय्यद यांच्या घरापर्यंत पोहचली. सुदैवाने घरातील लोकांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली. या सर्व दुकानांसह दोघा कुटुंबांचा संसार जळून राख झाला. यामुळे महिलांनी एकच आक्रोश केला.

जहीर शेख यांच्याही घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. स्थानिक युवकांनी धाव घेत मदतकार्य वेगाने केल्याने जवानांना आगीवर लवकर नियंत्रण मिळविता आले. आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. शॉर्टसर्किट व बॅटरीच्या स्फोटामुळे आग भडकल्याची चर्चा परिसरात रहिवाशांमध्ये सुरू होती. नुरी चौकाचा हा संपूर्ण परिसर अत्यंत दाट लोकवस्ती व ऑटोमोबाइल, भांगरमालाची दुकाने, गेरेज, वेल्डिंगची दुकाने यांचा आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, केंद्र प्रमुख दत्तात्रय गाडे, लिडिंग फायरमन किशोर पाटील, संतोष आगलावे, राजेंद्र मोरे अनिल गांगुर्डे, घनश्याम इंफळ, प्रदीप बोरसे, प्रदीप परदेशी, इसहाक काझी, नाझीम देशमुख, गणेश गायधनी, शरद देटके, राजेंद्र खरजुल, बाळू पवार यांच्यासह प्रशिक्षणार्थी जवान यश वझरे उमेश सोनवणे यांनी शर्तीचे प्रयत्न करत चहूबाजूंनी पाण्याचा मारा करून आग विझवली. भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग