बोरगांवी शॉर्टसर्किटमुळे घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 14:13 IST2019-12-16T14:13:23+5:302019-12-16T14:13:36+5:30
बोरगांव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे चंद्रकांत काशीनाथ भरसट यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

बोरगांवी शॉर्टसर्किटमुळे घराला आग
बोरगांव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे चंद्रकांत काशीनाथ भरसट यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री ९.३० वाजता घरात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले. आग इतकी भयानक होती की केवळ काही मिनिटात सर्व घरात पसरली व घर सागवानी लकडाने बनवलेले असल्याने आगीने अधिक रौद्र रूप धारण केलेले होते. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले, पण प्रयत्न व्यर्थ गेले.
सापुतारा येथील अग्निशमक दलाचा बंद तुकाराम सेठ कार्डिले यांनी फोन करून बोलावला. त्यांनी हॉलमधील आग विझवली नंतर प्रेशरने पाणी मारून दोन तासांनी आग आटोक्यात आली, पण संपूर्ण घर खाक झाले होते. सकाळी मंडल अधिकारी, तलाठी यानी पंचनामा केला तर महावितरणचे वाजे यांनी पाहणी करून पुढील कार्यवाही लवकर करू असे सांगितले.