दुगलगावी चाºयाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:13 IST2018-02-21T00:11:02+5:302018-02-21T00:13:01+5:30
अंदरसुल : येथुन दहा किलोमीटर असलेले दुगलगाव ता येवला येथील शेतकरी चांगदेव एकनाथ लासुरे यांच्या राहत्या वस्तीवर चाºयास अचानक आग लागल्याने संपूर्ण मकाचारा जळुन खाक झाला. अंदाजे एक लाख तीस हजार रु पयांचे नुकसान झाले आहे.

दुगलगावी चाºयाला आग
अंदरसुल : येथुन दहा किलोमीटर असलेले दुगलगाव ता येवला येथील शेतकरी चांगदेव एकनाथ लासुरे यांच्या राहत्या वस्तीवर चाºयास अचानक आग लागल्याने संपूर्ण मकाचारा जळुन खाक झाला. अंदाजे एक लाख तीस हजार रु पयांचे नुकसान झाले आहे. दुगलगाव येथे शेतावर राहत असलेल्या गट न २ ब मध्ये घरालागत २० ट्रॅकटर मका चारा व ५ ट्रॅकटर कुटी चारा होता १८ तारखेला दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान अचानक चाºयाने पेट घेतला चारा जळत असल्याचे लक्षात आल्यावर आग विझविण्याचा प्रयत्न होऊनही आग आटोक्यात न आल्याने तात्काळ अग्निशमन दलाने आग विझविण्यात आली आगीचे कारण मात्र समजू शकले नाही . कोणतीही जीवित हानी झाली नाही एक लाख तीस हजार रु पयांचे नुकसान झाले असून तसा बोकटे सजा तलाठी यांनी रीतसर पंचनामा केला आहे. शेतकरी चांगदेव लासुरे यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे