शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नाशिक शहरात फटाक्यांचा ‘आवाज’च!

By श्याम बागुल | Published: November 07, 2018 3:51 PM

न्यायालयाने दररोज रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत दोनच तास फटाके वाजविण्यास मुभा दिली असून, त्यानंतर फटाके वाजविल्यास ते कायद्याने गुन्हा ठरविला आहे. सर्व राज्य सरकारांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाने दिवाळीच्या पाच दिवसात असा शब्द प्रयोग

ठळक मुद्देदणदणाट : न्यायालयाच्या आदेशाकडे पाठ

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने वाढत्या ध्वनी व वायु प्रदुषणाचा विषय गांभीर्याने घेत दिवाळी सणाच्या पाच दिवस उत्सव काळात विशिष्ट वेळेतच फटाके फोडण्याचे निर्देश सरकारला देवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असले तरी, गेल्या दोन दिवसांपासून शहरात चोवीस तास फटाक्यांचाच ‘आवाज’ सुरू आहे. बुधवारी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पहाटे चार वाजेपासून सुरू झालेला फटाक्याचा दणदणाट रात्री उशिरापर्यंत कायम असला तरी, त्याबाबत कोणावरही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.न्यायालयाने दररोज रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत दोनच तास फटाके वाजविण्यास मुभा दिली असून, त्यानंतर फटाके वाजविल्यास ते कायद्याने गुन्हा ठरविला आहे. सर्व राज्य सरकारांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाने दिवाळीच्या पाच दिवसात असा शब्द प्रयोग केल्याने बसुबारसपासून दिवाळी सुरू झाल्याचा अर्थ शासकीय यंत्रणा व फटाके विक्रेत्यांनी काढला, व त्यानुसार फटाके विक्रीचे दुकाने थाटले आहेत. मात्र फटाके वाजविणाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाकडे सोयीस्कर डोळेझाक केली असून, गेल्या तीन दिवसांपासून रात्री तर फटाके उडविण्यातच येत आहेत, परंतु पहाटे देखील चार, पाच वाजेपासून फटाक्यांचा दणदणाट होत आहे. मोठ्या आवाजाचे सुतळी बॉम्बचा यात वापर केला जात असून, पहाटेच्या सुमारास त्याचा आवाजही चोहोंकडे घुमू लागला आहे. बुधवारी लक्ष्मीपुजन असताना व त्यासाठी सकाळी सात वाजेपासून अमृत, शुभ व लाभ असे वेगवेगळे मुहूर्त असल्याने व्यापाºयांनी आपल्या सोयीच्या वेळेनुसार वहीपुजन केले, त्यावेळी मात्र जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली गेली. रात्री उशिरापर्यंत ही आतषबाजी कायम होती. शुक्रवारी भाऊबिजेपर्यंत दिवाळी सण असून, तो पर्यंत फटाक्यांची आतषबाजी करण्यास न्यायालयाची मुभा असल्यामुळे आणखी दोन दिवस फटाके फोडली जातील. मात्र प्रदुषण करणारे व मोठा आवाजाच्या फटाक्यावर असलेल्या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा गेल्या तीन दिवसात नजरेस पडली नाही. या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आल्याची एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. तक्रारच नाही तर कारवाई कोणावर करणार असा सवालाही त्यांनी केला. तर फटाक्याचा विषय ध्वनी व वायु प्रदुषणाशी निगडीत असल्यामुळे प्रदुषण महामंडळाकडे कारवाईसाठी बोट दाखविण्यात आले आहे.

टॅग्स :CrackersफटाकेNashikनाशिक