मनमाडजवळ कंटेनरला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 19:53 IST2018-01-09T19:53:16+5:302018-01-09T19:53:54+5:30
मनमाड : पुणे- इंदूर मार्गावर मनमाड जवळ अनकाई किल्ला परिसरात वीज कंपनीचे रोहीत्र घेउन जात असलेल्या कंटेनरला आग लागून या आगीत कंटेनरचा पुढील भाग जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मनमाडजवळ कंटेनरला लागली आग
मनमाड : पुणे- इंदूर मार्गावर मनमाड जवळ अनकाई किल्ला परिसरात वीज कंपनीचे रोहीत्र घेउन जात असलेल्या कंटेनरला आग लागून या आगीत कंटेनरचा पुढील भाग जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या मार्गाने निजामाबाद कडे विजेचे रोहीत्र घेउन जात असलेल्या व्हाल्वो कंटेनर क्रमांक एलएल-०२, जी - ६१२ अनकाई किल्ला पोलीस चौकी परिसरातून जात असताना त्यास अचानक आग लागली. पहाता पहाता आगीने रौद्र स्वरूप धारण केले. भर रस्त्यात कंटेनरला लागलेल्या या आगीमुळे या महामागावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती. वाहन चालक सुकरमन प्रसाद शंभुराम पांडे ( रा. मध्यप्रदेश) याने या आगीची खबर मनमाड पोलीस ठाण्यात दिली. सदर कंटेनर महावितरणचे रोहीत्र भारत बिजली इलेक्ट्रीकल ठाणे येथून निजामाबादकडे जात होता. या आगीमध्ये कंटेनरचा दर्शनी भाग ,केबीन, गियर बॉक्स, मशीन इंजिन जळून भस्मसात झाले. यात सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.