शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मेनरोड बाजारपेठेत कापड दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 14:11 IST

कापड व्यावसायिकदेखील येथे पोहचले. त्यांच्याकडून किल्ली घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचा दरवाजा उघडला. यावेळी आतमध्ये विविध लेडिज ड्रेस मटेरियल असल्याने आग चांगलीच धुमसत होती.

ठळक मुद्देशॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय दोन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण

नाशिक : शहरातील मेनरोड या मुख्य बाजारपेठेतील धुमाळ पॉइंट येथे असलेल्या एका लहान कापड दुकानाला रविवारी (दि.१४) अचानकपणे सकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागली. परिसरातील रहिवाशी व अन्य व्यापाऱ्यांनी घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला कळविली. माहिती मिळताच पंचवटी उपकेंद्राच्या दोन बंबांसह जवान घटनास्थळी पोहचले. अवघ्या तासाभरात आग पुर्णपणे विझविण्यात जवानांना यश आले.धुमाळ पॉइंट हा मेनरोडवरील अतिशय अरुंद असा भाग आहे. येथील चौकात असलेल्या एका लहान दुकानाला आग लागली. दुकानामध्ये अचानकपणे सकाळी शॉर्टसर्किट झाले आणि धुराचे लोट बाहेर दिसू लागल्याने परिसरात एकच घबराट पसरली. तत्काळ नागरिक ांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविली. पंचवटी उपकेंद्राचे टेलिफोन आॅपरेटर धीरज पाटील यांनी तत्काळ लिडिंग फायरमन संजय कानडे यांना माहिती दिली. त्वरित बंबचालक बाळू काकडे व बाळू पवार यांनी जवानांना घेऊन अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळ गाठले. फायरमन नितीन म्हस्के, संजय माळी, सोमनाथ भालेराव, राजू कदम यांनी तत्काळ पेटलेल्या दुकानावर पाण्याचा मारा सुरू केला. दुकान बंद असल्यामुळे आग विझविण्यास सुरूवातीला काही वेळ अडथळा निर्माण झाला. दरम्यान, कापड व्यावसायिकदेखील येथे पोहचले. त्यांच्याकडून किल्ली घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचा दरवाजा उघडला. यावेळी आतमध्ये विविध लेडिज ड्रेस मटेरियल असल्याने आग चांगलीच धुमसत होती. जवानांनी वेळीच पाण्याचा मारा सुरू केल्याने आग आटोक्यात आली. पंचवटी उपकेंद्राचे दोन बंब घटनास्थळी मदतकार्यास होते;मात्र बाजारपेठ असल्यामुळे शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयातूनदेखील एक बंबासह जवान घटनास्थळी अतिरिक्त कुमक म्हणून पोहचले होते. या दुर्घटनेत कुठल्याहीप्रकारची जीवीतहानी झाली नसली तरीदेखील सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. यापुर्वी याच दुकानात लॉन्ड्रीचा व्यवसाय सुरू होता. तेव्हा सुमारे दोन वर्षांपुर्वी या दुकानाला आग लागली होती, असे यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाfireआगNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दल