शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

अंबडमध्ये कारखान्यात आगीचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 16:49 IST

आगीच्या ज्वाला भडकल्यानंतर परिसरातील कारखान्यांच्या सुरक्षा रक्षकांच्याही बाब लक्षात आली. तत्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.

ठळक मुद्देदोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझलीएक कोटीचे नुकसान

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील खेळणी तयार करणाऱ्या एका कारखान्याला रविवारी (दि.३१) पहाटे पावणेसात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये सुमारे एक कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कारखाना बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तीन बंबांच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत आग विझविली.याबाबत अधिक माहिती अशी, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये अमोल इंडस्ट्रीज नावाचा लहान मुलांची खेळणी तयार करण्याचा कारखाना आहे. रविवारी पहाटे या कारखान्यातून अचानकपणे धुराचे लोट उठू लागले आणि क्षणार्धात संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीच्या ज्वाला भडकल्यानंतर परिसरातील कारखान्यांच्या सुरक्षा रक्षकांच्याही बाब लक्षात आली. तत्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या सिडको उपकेंद्राचे जवान लिडिंग फायरमन देवीदास चंद्रमोरे, रवींद्र लाड, फायरमन मोहियोद्दीन शेख, संजय गाडेकर, सुनील घुगे, अविनाश सोनवणे, बंबचालक इस्माईल काजी यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. पाण्याचा मारा करत भडकलेल्या आगीवर सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर दोन बंब व औद्योगिक वसाहतीचा एक अशा तीन बंबांच्या सहाय्याने सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर यश मिळविले.या आगीत जीवितहानी टळली असली तरी कारखान्यातील पाच मोल्डिंग मशीन, सीसीटीव्ही यंत्रणा, मोठ्या प्रमाणावर कच्चा माल व तयार वस्तूंचा माल जळून खाक झाला. सुमारे एक कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किट होऊन आग भडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलAccidentअपघातMIDCएमआयडीसी