शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

राष्ट्रपती पदकविजेते अग्निशमन अधिकारी गायकवाड यांचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 12:00 PM

राष्ट्रपती पदक विजेते नाशिक महापालिका अग्निशमन दलाचे उपकेंद्रीय अधिकारी दीपक भटू गायकवाड (४८, रा. सिडको) यांचा अमरावती येथे अपघाती मृत्यू झाला.

नाशिक : राष्ट्रपती पदक विजेते नाशिक महापालिका अग्निशमन दलाचे उपकेंद्रीय अधिकारी दीपक भटू गायकवाड (४८, रा. सिडको) यांचा अमरावती येथे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते सुटी संपवून नागपूर येथे अग्निशमन विभागीय प्रशिक्षणाकरिता शिवशाही बसने हजर होत होते. बसला अमरावती येथे अपघात झाल्याने त्यात गायकवाड गंभीर जखमी झाले होते.नाशिक अग्निशमन मुख्यालय येथे उपकेंद्रीय अधिकारी म्हणून गायकवाड सेवेत होते. अग्निशमन दलाचे धाडसी जवान म्हणून त्यांची ओळख होती. 2016 साली जिल्ह्यात आलेल्या महापुरात कुंदेवाडी येथे पुरात अडकलेल्या तिघांना तसेच पालखेड येथे सहा व्यक्तींना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले होते. तसेच जुन्या नाशकात मागील वर्षी कोसळलेल्या वाड्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या तिघा युवकांना त्यांनी अथक परिश्रम घेऊन बाहेर काढले होते. तसेच आडगाव, वडाळागाव परिसरात लागलेल्या भीषण आगीच्या वेळी ही गायकवाड यांनी अग्रभागी राहून शर्थीचे प्रयत्न करत आपत्कालीन मदतकार्य केले होते.त्यांची निवड राष्ट्रीय अग्निशमन विभागीय प्रशिक्षणासाठी झाली होती. जून महिन्यात प्रशिक्षण पूर्ण होणार होते. दरम्यान सुटीवर ते मागील आठवड्यात घरी आले होते. सुटी संपवून ते नागपूर येथे प्रशिक्षणसाठी शिवशाही बसने जात होते. बसला गेली रविवारी अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना उपचारासाठी अमरावती येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.  त्यांच्या निधनाने नाशिक अग्निशमन दलात शोककळा पसरली आहे.