अग्निशामक बंबचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:29 IST2018-06-25T00:28:55+5:302018-06-25T00:29:10+5:30

अग्निशामक मुख्यालयात बंबचालक म्हणून कार्यरत जगन्नाथ राजाराम पोटिंदे (५२) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.२२) दिवसपाळीवर नियमितपणे मुख्यालय येथे पोटिंदे हजर होते.

Fire brigade death due to heart attack | अग्निशामक बंबचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अग्निशामक बंबचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक : अग्निशामक मुख्यालयात बंबचालक म्हणून कार्यरत जगन्नाथ राजाराम पोटिंदे (५२) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
शुक्रवारी (दि.२२) दिवसपाळीवर नियमितपणे मुख्यालय येथे पोटिंदे हजर होते. संध्याकाळी सहा वाजता अचानकपणे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते दूरध्वनी कक्षात कोसळले. यावेळी उपस्थित जवानांनी तत्काळ त्यांना आपत्ती व्यवस्थापन आणीबाणी अंतर्गत सेवा देणाऱ्या जीपमधून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय उपचार सुरू असताना तासाभरानंतर पोटिंदे यांची प्राणज्योत मालवली. पोटिंदे हे म्हसरूळ गावातील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, तीन भाऊ असा परिवार आहे. पोटिंदे हे अत्यंत कष्टाळू होते. मागील २८ वर्षांपासून अग्निशामक दलात बंबचालक म्हणून सेवा बजावत होते. अचानकपणे पोटिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अग्निशामक दलावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. पोटिंदे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान केले.

Web Title: Fire brigade death due to heart attack

टॅग्स :Deathमृत्यू