मालेगावमध्ये सुताच्या गोडाऊनला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 19:06 IST2020-01-17T19:06:42+5:302020-01-17T19:06:54+5:30
आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की घटनास्थळ शहरापासून 10ते12किलोमीटर दूर असुनही धुराचे लोट शहरातून दिसत होते.

मालेगावमध्ये सुताच्या गोडाऊनला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
मालेगाव मध्य (नाशिक) : शहरालगतच्या लोणवडे शिवारातील महालक्ष्मी सुताच्या गोडावुन सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मोठी आग लागली.
चाळीसगाव फाटा येथील तालुका पोलीस ठाण्यासमोर असलेल्या पाॅप्लिस्टर सुताचे कोईनचे गोडाउन आहे. पाॅलिस्टर धागा असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करून संपुर्ण गोडावुनला कवेत घेतले. मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी पाच बंबांच्या सहाय्याने शर्थिचे प्रयत्न केले.आग आटोक्यात असली तरी नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे.
आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की घटनास्थळ शहरापासून 10ते12किलोमीटर दूर असुनही धुराचे लोट शहरातून दिसत होते.
महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे माताजी गोडाऊन असे नाव असून जीवनराम रामुराम लेगा या राजस्थानच्या मालकाचे ते आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.