त्र्यंबकेश्वर तालुक्यात घराला आग,लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 13:17 IST2020-01-02T13:17:19+5:302020-01-02T13:17:31+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील टाकेदेवगाव पैकी धाराची वाडी येथील घराला आग लागुन लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.

 Fire breaks into the house, damages millions in Trimbakeshwar taluka | त्र्यंबकेश्वर तालुक्यात घराला आग,लाखोंचे नुकसान

त्र्यंबकेश्वर तालुक्यात घराला आग,लाखोंचे नुकसान

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील टाकेदेवगाव पैकी धाराची वाडी येथील घराला आग लागुन लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तानाजी शिद, नामदेव बांगारे आदी कार्यकत्यांनी भेट देऊन पाहणी केली. घर मालक रामा शिवा मेंगाळ यांच्याकडुन अधिक माहिती घेउन सर्व कार्यकर्ते त्र्यंबकश्वर येथे येऊन त्यांनी तहसिलदार कार्यालयात जाऊन त्यांनी तहसिलदार दीपक गिरासे यांची भेट घेउन त्यांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला.
रामा शिवा मेंगाळ असे या घर मालकाचे नाव आहे. घरात आग लागली त्यावेळी यावेळी लहान मुले बाहेरच खेळत होती. आगीचे कारण समजू शकले नाही. तांदुळ, किराणा, कपडे, मोबाईल, तेल आदी जीवनाश्यक माल आगीच्या भक्षस्थानी पडला. बांगारे कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसिलदारांना करण्यात आले आहे.

Web Title:  Fire breaks into the house, damages millions in Trimbakeshwar taluka

टॅग्स :Nashikनाशिक