मनमाडला पुष्ठा बनवणाऱ्या कंपनीला आग, बॉयलर फुटल्याने आग लागल्याची माहिती
By धनंजय वाखारे | Updated: January 22, 2024 15:28 IST2024-01-22T15:28:19+5:302024-01-22T15:28:44+5:30
आगीमुळे धुराचे प्रचंड लोट आकाशात दूरवर नागरिकांना दिसत होते.

मनमाडला पुष्ठा बनवणाऱ्या कंपनीला आग, बॉयलर फुटल्याने आग लागल्याची माहिती
मनमाड (नाशिक) :नाशिक जिल्ह्यातील मनमाड मधील नगर चौकी येथील निंबस पॅकेजिंग कंपनीला आग लागण्याची घटना घडली असून कंपनीमधील बॉयलर फुटल्याने आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आगीमुळे धुराचे प्रचंड लोट आकाशात दूरवर नागरिकांना दिसत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असले तरी भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोळ आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.आग पसरत असल्याने कंपनीमधील अन्य बॉयलर फुटत असून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.