मका ठिकरीसह भुसा विक्रीतून शोधला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:04 IST2020-02-11T00:38:30+5:302020-02-11T01:04:29+5:30
कायम दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या येवला तालुक्यात पालखेड डावा कालवा लाभक्षेत्राखाली मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले जाते. मात्र यंदा परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान झाले. या मका पिकापासून आता तरुणांनी रोजगार शोधला असून, मका बिटीमधून निघणाऱ्या ठिकºया आणि भुसा यांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या विक्र ीतून रोजगार उपलब्ध केला आहे. तालुक्यात शंभरहून अधिक तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत.

जळगाव नेऊर येथे पिक अप वाहनातून विक्रीसाठी आणलेल्या मका ठिकरी.
जळगाव नेऊर : कायम दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या येवला तालुक्यात पालखेड डावा कालवा लाभक्षेत्राखाली मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले जाते. मात्र यंदा परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान झाले. या मका पिकापासून आता तरुणांनी रोजगार शोधला असून, मका बिटीमधून निघणाऱ्या ठिकºया आणि भुसा यांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या विक्र ीतून रोजगार उपलब्ध केला आहे. तालुक्यात शंभरहून अधिक तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातही मका पिक घेतले परंतु, आधी लष्करी अळीचे आक्रमण आणि नंतर परतीच्या अवकाळी पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता नुकसानग्रस्त पिकातूनही युवकांनी रोजगार शोधला असून, पिकापासून निघणाºया ठिकºया व भुसा विक्रीस आणला जात आहे. या व्यवसायात दररोज दोन ते तीन हजार रु पये एका गाडीला मिळत असल्याने तरु णांच्या हाताला काम मिळाले आहेत. शेतीबरोबरच ठिकरी व्यवसायही सांभाळला जात असल्याने अनेक शेतकरी कुटुंबांना उदरनिर्वाहाचे आणखी एक साधन मिळाले आहे. जळगाव नेऊर परिसरातून रोज किमान दहा ते पंधरा
गाड्या बाजारात जात आहेत. शेतकºयांच्या बांधावर जाऊन २५०० ते २७०० रु पये दर देऊन मका ठिकरी खरेदी केली जाते. सदर
मका ठिकरी अंगणगाव, नागडे, सिन्नर, शिंदे-पळसे, धुळगाव फाटा या ठिकाणी विक्र ीसाठी नेला जात आहे. दरम्यान, सध्या शेतकºयांनी साठवून ठेवलेला मका काढत असून, दिवसेंदिवस मका भावात घसरण होत असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून मका ठिकरी विक्र ी व्यवसायाची निवड केली. त्यातून रोजगार मिळाल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लागला आहे. मका ठिकारी-भुसा यांना परिसरातून चांगली मागणी आहे. अन्य गावातील तरुणही आता या व्यवसायाकडे वळाले आहेत.
- बाबासाहेब मराठे, जळगाव नेऊर