कोविडमुळे कोलमडले शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:15 IST2021-05-08T22:37:54+5:302021-05-09T00:15:32+5:30
कवडदरा : खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे यांची खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.

कोविडमुळे कोलमडले शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट
कवडदरा : खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे यांची खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.
कोविडमुळे लॉकडाऊन आणि खतांवरील वाढत्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस, शेतीमालाचे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे हाती आलेला शेतीमाल बेभावात विकावा लागल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हीच परिस्थिती शेतकरी पुन्हा अनुभवत आहे. आताही कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला तसेच इतर फळे माल शेतातच सडला आहे.
खरीप हंगाम अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, भरवीर बु., साकूर, पिंपळगाव, घोटी बु. परिसरात शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत, बी-बियाणे याची खरेदी करण्यासाठीची सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.
एकीकडे शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतीमालाला मिळणारा भाव पाहता यावर्षी रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी खतांच्या किमतीत ३०० ते ५०० रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे आधीच मोडकळीस निघालेली शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खतांच्या दरवाढीमुळे पुरती कोलमडली आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे ७ एप्रिलपासून खतांच्या किमतीत प्रतिबॅग ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थचक्राला मोठा फटका बसणार आहे.
- सचिन सहाणे, शेतकरी, साकूर.