उमेदवारांना आर्थिक भुर्दंड
By Admin | Updated: December 3, 2014 01:29 IST2014-12-03T01:29:07+5:302014-12-03T01:29:36+5:30
आॅनलाइन अर्जाचा हेका कायम ग्रामपंचायत निवडणूक :

उमेदवारांना आर्थिक भुर्दंड
नाशिक : गुरुवारपासून सुरू होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे नामांकन कोणत्याही परिस्थितीत आॅनलाइनच भरण्याचा आपला हेका कायम धरणाऱ्या राज्य निवडणूक आयोगापुढे अखेर निवडणूक अधिकाऱ्यांना नमते घ्यावे लागले. वीजपुरवठा, इंटरनेटचा अभाव यांसारखे प्रश्न असले तरी, संग्राम या खासगी यंत्रणेमार्फत ही सोय घेऊन प्रसंगी उमेदवारांवर आर्थिक बोजा टाकण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्य आयोगाने उमेदवारांना आॅनलाइन नामांकन भरण्याची सक्ती केली होती; परंतु त्याबाबतची माहिती उमेदवारांपर्यंत वेळेत न पोहोचल्याने व गावोगावी इंटरनेटची सुविधा नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याबाबत आयोगाला अवगत करून सक्ती मागे घेण्याचा प्रस्तावही पाठविला होता. त्यामुळे आयोगाने दोन्ही पर्याय खुले ठेवले होते. आता मात्र २३ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या व गुरुवारपासून प्रत्यक्ष नामांकन दाखल होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी आयोगाने आॅनलाइन नामांकन सक्तीचे केले आहे. त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ग्रामपंचायत निवडणूक विभाग व निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यात प्रत्येकाने ग्रामपंचायत पातळीवर संगणकाची उपलब्धता, विजेची सोय, इंटरनेट कनेक्शन यांसारख्या सुविधांची वानवा बोलून दाखविली; परंतु आयोगाचे सचिव मधुकर गायकवाड व अविनाश सणस यांनी अडचणींवर मात करण्याचा सल्ला देत ग्रामपंचायत पातळीवर महा-ई-सेवा केंद्राप्रमाणे संग्रामची खासगी केंद्रे कार्यान्वित असल्याने त्यांच्या माध्यमातून नामांकन अर्ज दाखल करण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून द्यावी