वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:10 IST2020-09-12T22:27:10+5:302020-09-13T00:10:39+5:30
त्र्यंबकेश्वर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील विद्रोही लोकशाहीर स्व.वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.

लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या कुटूंबियांना मदतीचा धनादेश देताना डॉ.जालिंदर घिगे, उद्धव रोंगटे, रविराज भांगरे, चेतन कांबळे, अॅड किरण विधाते आदी.
ठळक मुद्देसांस्कृतिक कार्यक्रमातुन समाजात प्रबोधन
त्र्यंबकेश्वर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील विद्रोही लोकशाहीर स्व.वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही संघटना समाजातील तळागाळात आपल्या शाहीरीतुन नाटका द्वारे गायनाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमातुन समाजात प्रबोधन करते. सवर्सामान्यां साठी अशा गरजु कुटुंबियांना शासनाकडून कुठलेही अनुदान न मिळता केवळ सेवाभावी वृत्तीने काम करणारी अशी ही संघटना आहे. यावेळी डॉ.जालिंदर घिगे, उद्धव रोंगटे, रविराज भांगरे, चेतन कांबळे, अॅड किरण विधाते आदी उपस्थित होते.