Financial aid to farmers | शेतकऱ्यांना आर्थिक मदत
शेतकऱ्यांना आर्थिक मदत

इंदिरानगर : युनिक ग्रुपच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या इगतपुरी तालुक्यातील गवांदे गावातील दोन शेतकऱ्यांना रोख स्वरूपाची आर्थिक मदत करण्यात आली.
नाशिक जिल्ह््यात परतीच्या पावसाने अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याने त्यांना मदतीचा हातभार म्हणून राजीवनगर येथील युनिक ग्रुपच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील गवांदे गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी दादू दरावडे यांना रोख ११ हजार रु पये व भाऊ दरावडे यांना पाच हजार रुपये रोख युनिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मनपा सभागृहनेता सतीश सोनवणे यांच्या हस्ते आर्थिक मदत देऊन धीर देण्यात आला. युनिक ग्रुपच्या वतीने दरवर्षी दिवाळीत आदिवासी पाड्यात जाऊन कपडे व फराळाचे वाटप करून दिवाळी साजरी करतो, यंदा नुकसानग्रस्त दोन शेतकºयांना आर्थिक मदत देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सोनवणे यांनी सांगितले. याप्रसंगी युनिक शैलेश कुलकर्णी, शेखर निकुंभ, शरद गांगुर्डे, सुभाष कडलग, सोज्वळ थेटे, किशोर शिरसाठ, अनिल जाचक, महिंद्र राजपुत, अनुपकुमार बागड, कैलास देवांग, अनिल देवांग, रवी महाले, मुकेश जैन, सुधाकर गायधनी, सचिन सोनी, नवनाथ चव्हाण उपस्थित होते.

Web Title:  Financial aid to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.