बिबट्याच्या हल्यातील जखमी वृध्द महिलेला आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:36 PM2020-02-16T18:36:37+5:302020-02-16T18:37:13+5:30

वरखेडा : दिडोरी तालुक्यातील चौसाळे येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने तिला वैद्यकीय उपचारासाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली.

Financial aid to an elderly woman injured in infanticide | बिबट्याच्या हल्यातील जखमी वृध्द महिलेला आर्थिक मदत

दिंडोरी तालुक्यातील चौसाळा येथील बिबट्याने हल्ला केलेल्या महिलेला उपचारासाठी आर्थिक मदत देतांना अरु ण आहेर, सदु गावित, भास्कर जोपळे, हिरामण गावित, डी. के. चौधरी, चेतन जाधव ग्रामस्थ आदी.

Next
ठळक मुद्देवृद्ध महिला मिराबाई जोपळे यांच्यावर शेतात काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

वरखेडा : दिडोरी तालुक्यातील चौसाळे येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने तिला वैद्यकीय उपचारासाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली.
त्यामध्ये अहिवंतवाडी गटातील जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावित स्थानिक ग्रामपंचायत यांच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली. दिंडोरी तालुक्यात गेल्याच आठवड्यात चौसाळे येथील आदिवासी वृद्ध महिला मिराबाई जोपळे यांच्यावर शेतात काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
त्यांची घरची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या नाजूक असल्याने ग्रामसेवक संघटना आणि रोहिणी गावित स्थानिक सरपंच आणि आदिवासी संघर्ष समितीचे सदाशिव गावित यांनी उपचारासाठी हातभार लावला. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष अरु ण आहेर, ग्रामसेवक संघटनेचे विश्वनाथ तलवारे, रवींद्र चौधरी, चेतन जाधव, डी. के. चौधरी, आर्वी मिस्तरी, डी. एल. गायकवाड, शरद जाधव, बी. पी. चौधरी जे. एम. पवार, सरपंच भास्कर जोपळे, उपसरपंच हिरामण गावित, पोलीस पाटील संदीप चोपडे, शब्बीर शेख, नारायण तुंगार, घेवर तुंगार, गिरीधर जोपळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title: Financial aid to an elderly woman injured in infanticide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.