अखेरीस सुर्वे वाचनालय खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:50 IST2019-05-16T00:49:55+5:302019-05-16T00:50:13+5:30

मागील आठवड्यात महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका, वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात आली असताना यात अश्विननगर येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयालाही सील लावण्यात आले होते.

 Finally Survey opened the library | अखेरीस सुर्वे वाचनालय खुले

अखेरीस सुर्वे वाचनालय खुले

सिडको : मागील आठवड्यात महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका, वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात आली असताना यात अश्विननगर येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयालाही सील लावण्यात आले होते. यामुळे सर्वत्र नाराजी पसरली असताना अखेरीस मनपाने वाचनालयाचे दार उघडे केले.
महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या आधारे मनपाने नाशिक शहरासह सिडको भागातील त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका, वाचनालय, समाजमंदिर, व्यायमशाळा तसेच धार्मिक मंदिरेदेखील सील करण्याची मोहीम राबविली. या मोहिमेमुळे सिडको भागासह सर्वत्र मनपाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले होते. याबाबत सिडको भागातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने निषेधही नोंदविण्यात आला होता. यानंतर काही प्रमाणात मनपाने याकडे नरमाईची भूमिका घेतली. परंतु ज्या मिळकती मनपाने सील केल्या आहेत त्यांना रेडीरेकनरनुसार भाडे आकारण्याचा घाट घातला असून, त्यास कडाडून विरोध केला जात आहे. यात मनपाने अश्विननगर येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयदेखील सील केले असल्याने सिडकोवासीयांमध्ये नाराजी होती. अखेरीस मनपाने काही अटी-शर्तीच्या अधीन राहून सुर्वे वाचनालय खुले केले आहे.
वाचनालयाचा लौकिक
अश्विननगर येथील सुर्वे वाचनालयात सुर्वे यांना मिळालेले जनस्थान, पद्मश्री, संत कबीर या पुरस्कारांसह २५० हून अधिक पुरस्कार आहेत. तसेच ३० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा याबरोबरच आरोग्य वैद्यकीय मदत केंद्र, विविध कोर्सेसचे मोफत ट्रेनिंग सेंटर आदी सुविधा याठिकाणी आहेत.

Web Title:  Finally Survey opened the library