शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

... अखेर त्या व्हिडिओवर मंत्री दादा भुसेचं स्पष्टीकरण, सांगितलं चापट मारल्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 18:23 IST

मालेगाव येथील शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाचा आयोजन २३ डिसेंबरपासून सुरू आहे.

नाशिक - महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये नाशिकचे पालकमंत्री असलेले दादा भुसे एका तरुणाला चापट मारताना आणि शिव्या देताना दिसत आहेत. आता, माध्यमांतील टीकेनंतर आणि विधानसभेत पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर दादा भुसेंनी व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

मालेगाव येथील शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाचा आयोजन २३ डिसेंबरपासून सुरू आहे. दररोज २ ते ३ लाख भाविक येतात, अंदाजे ७५ ते ८० टक्के महिला भगिनी या कथेचं श्रवण करतात. त्या कार्यक्रमस्थळी या दोघांनी अतिशय चुकीचं कृत्य केलं होतं, जे की समाजातील नागरिक त्याच समर्थन करु शकत नाही. त्यावेळी, तिथे मोठा मॉबही जमला होता. मग, मी पोलिसांना संबंधितांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत. मी त्या क्षणाला तसं केलं नसतं तर, त्या मॉबच्या भावना तीव्र होत्या, खूप मोठा प्रसंग तिथे निर्माण झाला असता. मात्र, किरकोळ घटनेतून आम्ही तो प्रसंग मार्गी लावला आहे, असे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिले. तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी माहिती घ्यावी, माहिती घेतल्यानंतर तेही सर्वकाही मान्य करतील, असेही मंत्री भुसे यांनी म्हटलं. 

जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत काही सवाल उपस्थित केले आहेत. दादा भुसेंवर कारवाई करण्याचा संदर्भ देत आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, ''मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात. मुख्यमंत्री साहेब, कुठला गुन्हा पोलिस घेणार? पोलिसांसमोर मारले. माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर  बसवलत, #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृताबरोबर आपली बैठक, आता बोला..'' असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

मालेगाव शहरात महाशिवपुराण कथेचे आयोजन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. ही कथा ऐकण्यासाठी लाखों भाविकांची गर्दी होत आहे. गर्दीमध्ये काही चोरट्यांनी पाकीटमारी आणि महिलांचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला, पण दोघा संशयितांना पोलिसांनी पकडले. यातील एकाला दादा भुसे यांनी आधीच्या दिवशीच पोलीसांच्या ताब्यात देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तोच चोर बस स्थानक परिसरात आढळून आल्याने दादा भुसे तिथे पोहचले होते. यावेळी आक्रमक झालेल्या दादा भुसे यांनी थेट दोघा तरुणांचे फोटो काढा म्हणत शिवीगाळ केली, त्यात एकच्या श्रीमुखातही भडकवली. यावेळी बाजूलाच पोलिसही उपस्थित होते. पोलिसांसमोर दादा भुसे यांनी त्या व्यक्तीला मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे, यापूर्वीही दादा भुसे यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडministerमंत्रीPoliceपोलिस