...अखेर मालेगाव येथील मोहन चित्रपटगृह केले कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 00:53 IST2021-03-22T00:53:00+5:302021-03-22T00:53:23+5:30
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शासनातर्फे जमावबंदीचा आदेश असताना शहरातील मोहन चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याप्रकरणी महापालिकेतर्फे संबधित चित्रपटगृहाच्या चालकास नोटीस बजावण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

...अखेर मालेगाव येथील मोहन चित्रपटगृह केले कुलूपबंद
मालेगाव : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शासनातर्फे जमावबंदीचा आदेश असताना शहरातील मोहन चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर मोठ्या
प्रमाणात गर्दी केल्याप्रकरणी महापालिकेतर्फे संबधित चित्रपटगृहाच्या चालकास नोटीस बजावण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
शुकवारी ही बाब उघडकीस आली होती. त्याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. मनपा आयुक्त दीपक कासार यांच्या यांच्या आदेशानुसार प्रभाग अधिकारी सुनील खडके
आणि कर्मचाऱ्यांनी मोहन चित्रपटगृहाचे मालक यश पांडे व दीपक पवार यांना जमावबंदीचा आदेश असताना चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याप्रकरणी नोटीस
बजावली. सध्या चित्रपट दाखविण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
हुल्लडबाजीचा व्हिडीओ व्हायरल; प्रशासनाकडून कारवाईचा बडगा
सध्या मालेगावी कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या पमाणावर वाढ होत असतांना कोरोना नियमांना केराची टोपली दाखवत सिनेमाप्रेमी मालेगावकरांनी चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर गर्दी केली. ना मास्क, ना सुरक्षित अंतर अशा या हुल्लडबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराची कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी गंभीर दखल घेतली. चित्रपटगृहावर शुक्रवारी सिनेमाप्रेमी मालेगावकरांची गर्दी उसळली होती.