शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर जाखोरीमध्ये बिबट्या जेरबंद; दारणाकाठाला मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 23:09 IST

मागील दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात चौघांचा बळी दारणाकाठावरील हिंगणवेढे, बाभळेश्वर, दोनवाडे या गावांमध्ये गेला तर तीघे सुदैवाने बचावले.

ठळक मुद्देभय कमी होण्यास मदत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्नआपल्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घ्यावी

नाशिक : दारणानदीकाठालगतच्या पंचक्रोशीत मागील महिनाभरापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने गावकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत होती. जाखोरी गावात अखेर गुरूवारी (दि.२) रात्री दहा वाजेच्या सुमारास एक प्रौढ बिबट्यावनविभागाने लावलेल्या पिंजºयात जेरबंद झाला. या गावापासून जवळच असलेल्या बाभळेश्वरमध्ये काही दिवसापुंर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. जाखोरीत जेरबंद झालेल्या बिबट्यामुळे काही प्रमाणात दारणाकाठाच्या गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बारामाही वाहणा-या दारणा-गोदावरी नदीचे प्रशस्त खोरे आणि नगदी पीक ऊसाची विस्तीर्ण लागवड यामुळे बिबट्यांना या भागातील गावांमध्ये पोषक असे वातावरण मिळाले आणि बिबट्यांची संख्या वाढू लागल्याचे निदर्शनास आले. मागील दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात चौघांचा बळी दारणाकाठावरील हिंगणवेढे, बाभळेश्वर, दोनवाडे या गावांमध्ये गेला तर तीघे सुदैवाने बचावले. यामुळे या भागातील गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप अन् भीतीचे वातावरण तयार झाले होते. मागील दोन महिन्यांपासून नाशिक पश्चिम वनविभागाचे बचावपथक दिवसरात्र एक करून विविध उपाययोजना राबवित बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अखेर वनविभागाच्या प्रयत्नांना गुरूवारी रात्री जाखोरीत यश मिळाले. दोन दिवसांपुर्वी येथील शेतकरी बबलू सय्यद यांच्या गट क्रमांक २८५मध्ये वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे, रेस्क्यू वाहनचालक प्रवीण राठोड, इको-एको वन्यजीव संस्थेचे स्वयंसेवक यांनी स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बिबट्याचा माग काढत पिंजरा दोन दिवसांपुर्वी पिंजरा लावला होता. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनीही पाहणी करून पिंजºयाची जागा योग्य असून यामध्ये बोकड सावज ठेवण्याची सुचना केली होती. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आणि अखेर जाखोरी गावात वनविभागाला अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास यश आले.

गावक-यांची भरली जत्राजाखोरी गावात बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी पंचक्रोशीत वाºयासारखी पसरली. पिंजºयात आलेला बिबट्या बघण्यासाठी आजुबाजुच्या लोकवस्तीवरील गावकºयांनी एकच धाव घेतली. यामुळे जणू या शेतात रात्रीच्या वेळी बघ्यांची जत्रा भरल्याचे चित्र होते. बिबट्याचा पिंजरा तत्काळ रेस्क्यू वाहनातून शासनाच्या रोपवाटिकेत हलविण्यात आला.

--वनविभाग त्यांच्यापरीने सर्वच उपाययोजना आणि प्रयत्न करत आहेत. गावक-यांनी आपल्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घ्यावी. या भागात तीन नव्हे तर चार पथके सातत्याने तळ ठोकून आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, केवळ संध्याकाळनंतर घराबाहेर पडू नये, आणि बिबट्याकडून संभाव्य मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. जाखोरी गावात पुन्हा नव्याने दुसरा पिंजराही तत्काळ लावण्यात आला आहे.-शिवाजी फुले, उपवनसंरक्षक

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव