अखेर महामार्गावरील उड्डाणपुलाची कामे पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:42 IST2020-07-17T21:03:27+5:302020-07-18T00:42:51+5:30
ओझर : भारतात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे बंद पडलेली मुंबई -आग्रा महामार्गाची कामे लॉकडाऊनला शिथिलता मिळाल्यानंतर ओझर येथील गडाख कॉर्नर ,सायखेडा चौफुली तर के.के. वाघ ते जत्रा हॉटेल, पिंपळगाव येथील चिंचखेड चौफूली अशी तीनही उड्डाणपूलांची कामे कामगारांकडून फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करून कामगारांकडून केली जात आहेत.

अखेर महामार्गावरील उड्डाणपुलाची कामे पूर्वपदावर
ओझर : भारतात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे बंद पडलेली मुंबई -आग्रा महामार्गाची कामे लॉकडाऊनला शिथिलता मिळाल्यानंतर ओझर येथील गडाख कॉर्नर ,सायखेडा चौफुली तर के.के. वाघ ते जत्रा हॉटेल, पिंपळगाव येथील चिंचखेड चौफूली अशी तीनही उड्डाणपूलांची कामे कामगारांकडून फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करून कामगारांकडून केली जात आहेत.
कामगारांना त्यांच्या ठेकेदाराकडून सॅनिटायझर, मास्क व वेळोवेळी जेवण, नाष्टा व राहण्याची व्यवस्था केलेली असल्याने कामगारांनी सांगितले.तसेच लॉकडाऊनच्या सुरु वातीलाच घरी गेलेले काही कामगार पुन्हा कामावर रु जू झाल्याने या कामांना गती मिळाली आहे. येत्या काळात होणाऱ्या उड्डाणपूलामध्ये खंडेराव मंदिरासमोर पूलाखालून ये-जा करण्यासाठी मार्ग होणार आहे.
ओझर गावचे ग्रामदैवत खंडेराव महाराज मंदिराजवळ दरवर्षी वाहतूक कोंडी होत असे. आता अनेक प्रश्न येत्या काळात होणाºया उड्डाणपुलामुळे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. या सर्व कामांनी नाशिक शहराची कनेक्टीव्हिटी देखील वाढेल आणि मुख्य म्हणजे अपघातांना लगाम बसणार असल्याने हा उड्डाणपूल ओझरकरांना ‘अच्छे दिन’ घेऊन येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच पिंपळगाव येथिल चिंचखेड चौफुली येथील अपूर्ण असलेला उड्डाणपूल देखील प्रगतीपथावर असल्याने वाहतूक कोंडी रोखण्यास मदत होणार आहे.
मटेरियलचा मिळण्यास सुरवात लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या कारखाने, कंपन्यां, सिमेंट व इतर मटेरियल आता मिळू लागण्याने आता सर्व कामांना गती प्राप्त झाली आहे त्यामुळे लवकरच हे सर्व कामे पूर्ण होतील अशीच अपेक्षा नागरिकांना आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे स्वगृही परतलेले कामगार पुन्हा कामावर हजर होत असल्याने महामार्गवरील कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबत कोरोना संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. ठेकेदारांनाकडून लवकर कामे पूर्ण केली जातील.
- दिलीप पाटील, व्यवस्थापक राष्टीय महामार्ग प्राधिकरण