दरवर्षी दसरा ( विजयादशमी ) च्या मुहूर्तावर लाल (पावसाळी) कांद्याचा खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात येतो. परंतु आश्चर्य म्हणजे गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी सर्वत्र होत असलेेले रिपरिप पावसामुळे कांदा लागवडीसाठी रोपे जगविणेे ही मुश्किल असताना चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी कौतिक जाधव यांनी कांदा लागवड करुन तब्बल एक ते दीड महिने आधीच शिवाय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लाल कांद्याचे उत्पादन घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चालू हंगामात नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम लाल कांदा पिकविण्याचा मान मिळविला त्याबद्दल बाजार समितीचे मुख्य संचालक श्रीपाल ओस्तवाल, पुंडलिक देवरे, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व कांदा व्यापारी खंडू देवरे, रघू काका (जापसन), प्रतिष्ठित व्यापारी व उमराणेचे माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल, पंकज ओस्तवाल, प्रवीण बाफणा, संतोष बाफणा, चिंधू खैरे, बबनराव नेहारकर, आण्णासाहेब गांगुर्डे, नितीन काला तसेच शेतकरी भाऊसाहेब सोनवणे यांच्या उपस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी कौतिक जाधव यांचा शाल श्रीफळ देेऊन सत्कार करण्यात आला.
इन्फो
सर्वोच्च बोली
यावेळी लाल कांद्याचे पूजन करण्यात येऊन लिलाव करण्यात आला. यावेळी बाफणा आडतेचे संचालक व कांदा व्यापारी संतोष बाफणा व भावेश बाफणा यांनी सर्वोच्च बोली लावत ३,१३१ रुपये दराने नवीन लाल कांदा खरेदी केला. यावेळी रामेश्वर कृषी मार्केटचे सचिव दौलतराव शिंदे तसेच उपसचिव व कर्मचारी तसेच यार्डातील सर्व प्रतिष्ठित व्यापारी, हमाल,मापारी उपस्थित होते. दरम्यान लाल पावसाळी कांदा बाजारात येण्यास अजून एक ते दीड महिना अवकाश असल्याने उन्हाळी कांदा बाजारभावावर याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे कृषी जाणकारांनी मत व्यक्त केले आहे
फोटो- २० रामेश्वर ओनियन
रामेश्वर कृृषी मार्केटात लाल कांदा पूजन व खरेदी प्रसंंगी जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देेेेवरे, प्रकाश ओस्तवाल, रघू काका, श्रीपाल ओस्तवाल, संतोष बाफणा व कांदा व्यापारी.
200921\20nsk_33_20092021_13.jpg
फोटो- २० रामेश्वर ओनियन रामेश्वर कृृषी मार्केटात लाल कांदा पुजन व खरेदीप्रसंंगी जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडु देेेेवरे, प्रकाश ओस्तवाल, रघु काका, श्रीपाल ओस्तवाल, संतोष बाफणा व कांदा व्यापारी.