आयपीएस अधिकाऱ्यांसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: September 14, 2016 00:41 IST2016-09-14T00:33:32+5:302016-09-14T00:41:19+5:30

आयपीएस अधिकाऱ्यांसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

Filing an FIR against family members including IPS officers | आयपीएस अधिकाऱ्यांसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

आयपीएस अधिकाऱ्यांसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

नाशिक : घरगुती वादाची माहिती पोलिसांना दिल्याचा राग येऊन पती व त्याच्या कुटुंबीयांनी बळजबरी घरात घुसून तोडफोड व मारहाण केल्याची घटना गंगापूररोड परिसरातील पूर्णवादनगरमध्ये रविवारी (दि़ ११) सकाळच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे या मारहाण प्रकरणातील संशयित हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी व त्यांचे कुटुंबीय आहेत़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद येथील नॅशनल पोलीस अकादमीत प्रोबेशनरी अधिकारी (आयपीएस) असलेले संदीप घुगे यांची पत्नी प्रसलत झाल्याने ते भाऊ अरविंद घुगे (डेप्युटी कमिशनर, बेळगाव), वडील भगवान घुगे (सेवानिवृत्त अधिकारी) यांच्यासह पत्नीला भेटण्यासाठी आले होते़ त्यावेळी घुगे कुटूंबियांनी कातकाडे यांच्या परिवारास मारहाण केली.
याप्रकरणी राकेश श्रीनिवास कातकाडे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात घुगे कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Filing an FIR against family members including IPS officers