महिलेस मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:12 IST2018-05-19T00:12:03+5:302018-05-19T00:12:03+5:30
नाशिकरोड : विवाहित महिलेस मारहाण, शिवीगाळ करून महिलेचा मोबाइल व अॅक्टिवा गाडी बळजबरीने घेतल्या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेस मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
नाशिकरोड : विवाहित महिलेस मारहाण, शिवीगाळ करून महिलेचा मोबाइल व अॅक्टिवा गाडी बळजबरीने घेतल्या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगर टाकळी समतानगर येथे राहणाऱ्या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पतीस द्वारका येथे घेण्यासाठी अॅक्टिवा (एमएच १५ एफडब्ल्यू ८६११) वरून जात होते. नासर्डी पुलाजवळील नाशिक्लब येथे संशयित बाबा शेख व त्याचा मित्र यांनी विवाहितेला शिवीगाळ करून कोयत्याचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याचा दम दिला. त्यांच्या जवळील दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल व ५० हजार रुपये किमतीची अॅक्टिवा बळजबरीने हिसकावून घेत संशयित बाबा शेख व त्याचा मित्र नाशिकरोडच्या दिशेने निघून गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.