नांदगावच्या सुवर्णकार समाजाकडून गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:44+5:302021-09-06T04:18:44+5:30
नांदगाव : मालेगाव येथील एका स्थानिक वृत्तपत्रातून सुवर्णकार समाजाबद्दल करण्यात आलेल्या गैरशब्दप्रयोगाबद्दल येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला ...

नांदगावच्या सुवर्णकार समाजाकडून गुन्हा दाखल
नांदगाव : मालेगाव येथील एका स्थानिक वृत्तपत्रातून सुवर्णकार समाजाबद्दल करण्यात आलेल्या गैरशब्दप्रयोगाबद्दल येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी येथील अहिर सुवर्णकार पंचाच्या वतीने श्याम दुसाने यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, मालेगाव येथील स्थानिक वृत्तपत्राने सोनार समाजासंबंधी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याच्या निषेधार्थ नांदगाव अहिर सुवर्णकार पंचाच्या वतीने पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे यांना निवेदन देण्यात आले. सदर प्रकरणी योग्य कार्यवाही न झाल्यास सुवर्णकार सराफ बाजार बंद करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी अहिर सुवर्णकार पंच नांदगावच्या अध्यक्ष सुरेखा विसपुते, अशोक विसपुते, सचिव श्याम दुसाने, सहसचिव शंकर विसपुते, नांदगाव सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्याम दाभाडे, वामनदादा पोद्दार, सल्लागार खंडू दंडगव्हाळ, राजेंद्र विसपुते, सोमनाथ दुसाने, निलेश दाभाडे, संजय देवरे, विनोद घोडके, अमित खरोटे, अमोल पिंगळे, गुलाब सोनार सर, संजय चित्ते, दत्तात्रेय वडनेरे, शशिकांत भालेराव, अनिल विसपुते, जितू चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटो - ०५ साेनार समाज
अहिर सुवर्णकार पंच नांदगावच्या वतीने पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे यांना निवेदन देताना अनिल विसपुते, श्याम दुसाने, सुरेश दंडगव्हाळ, शशिकांत भालेराव, वामन दंडगव्हाळ आदी.
050921\05nsk_11_05092021_13.jpg
फोटो - ०५ साेनार समाज अहिर सुवर्णकार पंच नांदगावच्या वतीने पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे याना निवेदन देताना अनिल विसपुते, शाम दुसाने, सुरेश दंडगव्हाळ,शशिकांत भालेराव, वामन दंडगव्हाळ आदी.