लासलगाव : लासलगाव येथील राम ॲग्रो या दुकानातून ३३ किलो कांदा बियाणे खरेदी करून ते शेतात पेरणी केल्यावर न उगवल्यामुळे ठेंगोडे येथील निंबा मोतीराम सोनवणे यांचे फिर्यादीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात ६८ हजार ५०० रूपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावरील राम ॲग्रो या शेतीपयोगी औषधे खते व बियाणे विक्री करणाऱ्या दुकानाचे संचालक संदिप ज्ञानेश्वर गायकर व मधुकर रामचंद्र गायकर यांचे कडून सोनवणे यांनी प्रशांत क॔पनीचे ६८ हजार ५०० रुपयांचे ३३ किलो कांदा बियाणे खरेदी करून शेतात पेरणी केले. मात्र ते शेतात उगवलेच नाही. त्यामुळे कांदा उत्पादक निंबा मोतीराम सोनवणे यांनी फिर्याद दाखल करताच सटाणा पोलिसांनी भादंवि कलम ४२० व ३४ नुसार गुन्हा दाखल करून लासलगाव येथील पोलिस कार्यालयात वर्ग केला आहे. अधिक तपास लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलिस करीत आहेत.
कांदा बियाणे न उगवल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:26 IST
६८ हजार ५०० रुपयांचे ३३ किलो कांदा बियाणे खरेदी
कांदा बियाणे न उगवल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल
ठळक मुद्देगुन्हा लासलगाव येथील पोलिस कार्यालयात वर्ग