लग्नाचे आमिष दाखवून बलात्कारयुवकांविरुद्ध गुन्हा दाखल ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:16 PM2020-08-29T23:16:46+5:302020-08-30T01:11:11+5:30

नाशिकरोड : मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अतिप्रसंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filed a case against the rapist by showing the lure of marriage. | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कारयुवकांविरुद्ध गुन्हा दाखल ।

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कारयुवकांविरुद्ध गुन्हा दाखल ।

Next
ठळक मुद्देमैत्रीतून झालेला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अतिप्रसंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटीतील हिरावाडी येथील पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एकलहरे येथील महाविद्यालयात २०१३ साली सोबत शिकणारा नितीन बाळू झिपरे (२५, रा. टाकळीरोड) याच्याशी ओळख झाली.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर २०१५ सालापासून संशयित नितीनने लग्नाचे आमिष दाखवून पीडित युवतीला त्याच्या राहत्या घरी बोलावून घेत तसेच वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. पीडित युवतीने लग्नाबाबत त्याला वेळोवेळी विचारले असता २०१८ सालापासून नितीन उडवाउडवीची उत्तरे तिला देऊ लागला. २१ आॅगस्ट २०२० रोजी नितीन हा लासलगाव येथील एका मुलीशी लग्न करणार असल्याचे तिला समजल्यानंतर पीडित युवतीला नितीनकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात
आले. तिने पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी संशयित नितीन याच्याविरुद्ध फिर्याद दिली. उपनगर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरदिवसा घरफोडी
नाशिकरोड : येथील करंजकर नगर परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून ४७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वंदना शिवाजी निकम यांनी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली. वंदना यांच्या घरात गुरुवारी (दि. २७) दुपारी २ वाजता चोरट्याने घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी उपनगर पोलीस तपास करीत आहेत.सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणे भोवले
नाशिक : सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण होईल, असा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात सुरेश चव्हाणके याच्याविरुद्ध विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहिम शब्बीर शेख (३८, रा. वडाळारोड) यांच्या फिर्यादीनुसार सुरेश चव्हाणके यांनी सोशल मीडियावरून प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल करून धार्मिक भावना दुखावल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Filed a case against the rapist by showing the lure of marriage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.