Filed against spouse with husband for motivating suicide | आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह प्रेयसीविरूद्ध गुन्हा दाखल
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह प्रेयसीविरूद्ध गुन्हा दाखल

वणी : पती व प्रेयसीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने लग्नाला सहा महिने पूर्ण होण्याच्या आतच आत्महत्या केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी वणी पोलिसात मंगळवारी (दि. १२)पती व प्रेयसीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला ताब्यात घेतले आहे.
दिंडोरी तालूक्यातील हस्ते दुमाला येथील बबनराव महाले यांनी मुलीच्या मृत्यूनंतर तिसºया दिवशी वणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, माझी अभियांत्रिकीची पदवीधर असलेली मुलगी पूजा महाले हिचा विवाह येवला येथील शेखर संजय शिंदे याच्याशी दि. १७ मे २०१९ रोजी झाला होता.
विवाहानंतर शेखर एका मुलीशी फोनवर वारंवार बोलत असल्याची बाब पुजाच्या निदर्शनास आली होती. याबाबत तिने शेखरला जाब विचारला असता त्याच्या वर्तनात काहीही
फरक पडला नाही. यासंदर्भात शेखरची आई व बहिणीस सांगितले असता त्यांनी शेखरची कानउघाडणी केली होती.
सहनशीलतेचा अंत झाल्याने पूजाने दि. ६ नोव्हेंबर रोजी पहाटे विषारी औषध सेवन केले. ही बाब कुटुंबीयांंच्या क्षात आल्यावर त्यांनी पुजाला वणीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दि. ८ रोजी तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला नाशिक येथे हलविले, मात्र उपचार सुरु असताना दि. ९ रोजी मध्यरात्री तिची प्राणजोत मालविली. पती व प्रेयसीने मानसिक खच्चीकरण केल्यानेच मुलीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मानसिक खच्चीकरण केले
काही दिवसानंतर रक्षाबंधनासाठी पुजा माहेरी आल्यावर तिची प्रकृती व्यवस्थित नव्हती. याबाबत तिच्या कुटुंबियांनी विचारपूस केली होती. तदनंतर भाऊबीजेसाठी माहेरी आली तेव्हाही पुजा चिंतेत असल्याची बाब कुटुंबियांच्या निदर्शनास आली होती. काही दिवसानंतर पुजा माहेरी असताना पती शेखर तसेच प्रेयसी भाग्यश्री भावसार भ्रमणध्वनीवरु न तिच्याशी संपर्क साधून सहा महिन्यात शेखर तुला फारकत देणार असून तू येवला येथे येऊ नको अशा शब्दात मानसिक खच्चीकरण केले.

Web Title:  Filed against spouse with husband for motivating suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.