'File a case against Varis Pathan' | ‘वारीस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करा’

वारीस पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन संजय महाजन यांना देताना प्रकाश गोसावी, संजय मोरे, नीलेश सोनवणे, तुषार गांगुर्डे, अब्दुल शेख, शिवमूर्ती खडके आदी.

पिंपळगाव बसवंत : एमआयएम, मुंबईचे प्रवक्ते, तसेच भायखळ्याचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला असून, पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पिंपळगाव बसवंतचे पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशातील शांततेसाठी पठाण यांचे वागणे धोकादायक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. कर्नाटकच्या गुलबर्गा येथील कार्यक्र मात वादग्रस्त विधान पठाण यांनी केल्याने समाजात तेढ, भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. अशी भीती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. पठाण यांच्याविरोधात संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. यावेळी मनसे निफाड तालुकाध्यक्ष प्रकाश गोसावी, पिंपळगाव शहरप्रमुख संजय मोरे, नीलेश सोनवणे, तुषार गांगुर्डे, अब्दुल शेख, शिवमूर्ती खडके, गिरीश कसबे, राजू भवर आदी उपस्थित होते.

Web Title: 'File a case against Varis Pathan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.