शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

आकडेवारीचा मेळ : नवे बजेट याच महिन्यात यंदाही फुटला अंदाजपत्रकाचा फुगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:03 AM

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा यंदाही फुगा फुटला असून, कागदोपत्री दर्शविलेले ७०० कोटी रुपये मिळणारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देनव्या वर्षाचे अंदाजपत्रक जानेवारीअखेरीस सर्व अंदाज कोसळतात

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा यंदाही फुगा फुटला असून, कागदोपत्री दर्शविलेले ७०० कोटी रुपये मिळणारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कोट्यवधींचा स्पील ओव्हर पुढील वर्षात वाढणार आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून स्थायी समितीला घाईघाईने अंदाजपत्रक करावे लागत असल्याने यंदा नव्या वर्षाचे अंदाजपत्रक जानेवारीअखेरीस मांडण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी फेबु्रवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर केल्यानंतर स्थायी समिती त्याला आकार देते आणि त्यानंतर महासभेवर अंदाजपत्रक पाठविले जाते. परंतु ही प्रक्रिया पार पाडताना आयुक्तांचे अंदाजपत्रक अपुरे असल्याचा दावा करीत स्थायी समिती विविध प्रकारच्या उत्पन्नात वाढ सुचविते आणि त्या आधारे काही कोटींनी अंदाजपत्रक फुगवते. महासभेतदेखील सर्वपक्षीय नगरसेवकांना सामावून घेण्यासाठी तसेच सत्तारूढ पक्षाच्या विविध योजना घुसवण्यासाठी आणखी उत्पन्न वाढीचे आकडे फुगवून त्यावर आधारित योजना आखल्या जातात. परंतु अखेरीस हा फुगा फुटतो कित्येकदा तर आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकानुसारही वार्षिक उत्पन्न मिळत नाही आणि त्यामुळेच सर्व अंदाज कोसळतात. चालू आर्थिक वर्षात म्हणजे २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी १,४०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. ते स्थायी समितीने १,७९९.३० कोटी इतके फुगवले. महासभेत त्याचा आकार आणखी वाढला आणि ते दोन हजार १७६ कोटी ४१ लाख इतके झाले. परंतु प्रत्यक्षात महासभेने दर्शविलेले मात्र सातशे कोटी रुपयांचे उत्पन्नच मिळणार नसल्याची चिन्हे आहेत. आयुक्तांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जेमतेम १,४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. म्हणजे आयुक्तांचे अंदाजपत्रक खरे ठरण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात प्रशासन स्थायी समितीला सुधारित अंदाजपत्रक सादर करणार असून, त्यात ही आकडेवारी मांडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.सुधारणा : दोन्ही अंदाजपत्रक एकदाचमहापालिकेचे अंदाजपत्रक हे गेल्या काही वर्षांपासून फेबु्रवारी महिन्यात मांडतात. याच महिन्यात स्थायी समितीचे सोळापैकी आठ सदस्य निवृत्त होत असल्याने घाईघाईने सदस्य अंदाजपत्रक तयार करतात. यंदा तसे होऊ नये यासाठी स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी २०१८-१९ या वर्षाचे अंदाजपत्रक जानेवारी महिन्यातच सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार सरत्या वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक आणि नव्या वर्षाचे अंदाजपत्रक एकाच वेळी मांडण्यात येणार आहेत.