मालेगावी देवीचा मळा भागात दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:12 IST2021-04-26T04:12:44+5:302021-04-26T04:12:44+5:30

मालेगाव : शहरातील देवीचा मळा उमराबाद भागात दोन गटात हाणामारी झाली असून, पवारवाडी पोलिसानी दंगलीचा गुन्हा दाखल केला ...

Fighting broke out in two groups in Malegaon Devi's Mala area | मालेगावी देवीचा मळा भागात दोन गटात हाणामारी

मालेगावी देवीचा मळा भागात दोन गटात हाणामारी

मालेगाव : शहरातील देवीचा मळा उमराबाद भागात दोन गटात हाणामारी झाली असून, पवारवाडी पोलिसानी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.

रफिक रशीद पिंजारी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, पोलिसानी वजीर पिंजारी, सुब्रराती वजीर पिंजारी, अमीर उर्फ राजू पिंजारी, अरमान पिंजारी, शोएब पिंजारी, सोहेल व शरीफ पिंजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रफिक यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, चार दिवसांपूर्वी छेड काढल्यामुळे पुतण्या शाहरुखला मारहाण केली होती, असे सांगितल्याचा राग आल्याने संशयितांनी बेकायदा जमाव जमवून लाठ्या-काठ्या व गजाने मारहाण केली. यात रफिक पिंजारी व अनिस अहमद हे जखमी झाले. याबाबतचा अधिक तपास जमादार मोरे करत आहेत. दरम्यान, अमीर नजीर पिंजारी उर्फ राजू यांनीही पवारवाडी पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसानी युनूस, चांद, भटूचा मुलगा भावड्या, अमीर, जब्बार व शब्बीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुतण्याला तुम्ही मारहाण केली तेव्हापासून तो घरी आला नाही, असे म्हटल्याचा राग आल्याने बेकायदा जमाव जमवून लाठ्या- काठ्या, लोखंडी गजाने मारहाण केल्याचे म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास जमादार पगारे करत आहेत.

Web Title: Fighting broke out in two groups in Malegaon Devi's Mala area