सुरगाणा - तालुक्यातील खांदुर्डी येथे झालेल्या हॉली बॉल स्पर्धेत दिंडोरी तालुक्यातील करंजखेड येथील फाईट क्लब या संघाने अंतिम सामन्यात विजयश्री खेचून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकविले.खांदुर्डी येथे आयोजित या हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार जे. पी. गावित यांचे हस्ते झाले होते. तर अंतिम सामन्यांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक हेमंत वाघेरे यांचे हस्ते विजेत्या संघाना देण्यात आले. दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या ा हॉलीबॉल स्पर्धेत तालुका व तालुक्याबाहेरील ४५ संघानी सहभाग घेतला होता. यास्पर्धेत फाईट क्लब (करंजवण, ता. दिंडोरी) प्रथम, सुरगाणा तालुक्यातील गुही हॉलीबाल संघाने द्वितीय तर ओझर येथील एच.ए.एल. संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकविले. या विजेत्या संघाचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. अंतिम सामना जिंकलेल्या करंजखेड येथील फाईट क्लब हॉलीबॉल संघात नामदेव जोपळे, विजय बागुल, राहुल गायकवाड, मनोज गायकवाड, निवृत्ती गायकवाड, सुनील गवळी यांचा सहभाग होता. त्यांना प्रशिक्षक राऊत सर यांचे मार्गदर्शन लाभले.
हॉली बॉल स्पर्धेत फाईट क्लब प्रथम
By admin | Updated: May 7, 2014 21:23 IST