फी वाढ विरोधातील लढा बाजारीकरणाविरुद्ध
By Admin | Updated: August 30, 2015 23:00 IST2015-08-30T22:59:33+5:302015-08-30T23:00:08+5:30
श्रीधर देशपांडे : आंदोलकांचा विजयी मेळावा संपन्न

फी वाढ विरोधातील लढा बाजारीकरणाविरुद्ध
नाशिक : शिक्षण संस्थांमधील फी वाढीच्या विरोधात दिला जाणारा लढा हा शिक्षकांच्या विरोधात नाही, तर बाजारीकरणाच्या विरोधात आहे. तथापि, अनेकदा हा लढा शिक्षकांच्या विरोधात असल्याचे सांगून दिशाभूल केली जात असल्याचे मत शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे अध्यक्ष श्रीधर देशपांडे यांनी व्यक्त केले.
सेंट लॉरेन्स शाळेने केलेल्या फी वाढीच्या विरोधात बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली पालकांनी दिलेल्या लढ्याला यश आले असून, शाळने फी वाढ पूर्णत: मागे घेतली आहे. आंदोलनाचा यशाचा विजयी मेळावा नुकताच साजरा करण्यात आला. बाजारीकरण विरोधी मंच आणि सेंट लॉरेन्स पालक संघटना यांच्या वतीने आयोजित विजयी मेळाव्याचा समारोपाप्रसंगी देशपांडे बोलत होते.
यामेळाव्याचे प्रमुख अतिथी पुणे येथील डी. वाय. पाटील पालक संघटनेचे संदीप चव्हाण यांनी सेंट लॉरेन्स शाळेतील पालकांच्या लढ्याचे कौतुक केले. यावेळी मंचाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त उपाध्यक्ष छाया देव यांनी नऊ वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. पुुढील कामाची दिशा डॉ. मिलिंद वाघ यांनी मांडली, तर दीनानाथ चौधरी यांनी सेंट लॉरेन्स शाळेतील आंदोलनाची माहिती
दिली.
यावेळी आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांचा सत्कार मुकुंद दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रीमती परिहार, अनिता बडगुजर, प्रियांका मोरे, ज्योती अहेर या पालकांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार राजेंद्र आव्हाड यांनी मानले. यावेळी अरुण धामणे, वसंत एकबोटे, सचिन मालेगावकर, अजित टक्के, विनायक येवले, प्रभाकर पाटील, किशोर फरांदे, भीमराव महाले, सोनाली चौधरी, श्रीपाद देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.