शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नाइट कर्फ्यू ; पहिल्याच दिवशी पावणेनऊशे लोकांना कारवाईचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 21:47 IST

बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपासून सर्वच पोलीस ठाणे हद्दीत गस्तीपथकाद्वारे व्यावसायिकांनाही सुचना देण्यात आल्या व नाकाबंदी पॉइंट सक्रीय करत दुचाकीस्वारांकडे चौकशी करण्यात आली.

ठळक मुद्देजमावबंदी, संचारबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू

नाशिक : शहर व परिसरात सातत्याने कोरोनाचे संक्रमण वेगाने सुरू आहे. बुधवारी (दि.१) शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात "मिशन बिगिन अगेन" अंतर्गत प्रभावीपणे जमावबंदी, संचारबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. सुमारे ८४६ इसमांवर पोलिसांनी दिवसभरात कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीवर एकापेक्षा अधिक प्रवास करणारे, मास्क न वापरणारे तसेच ह्यडिस्टन्सह्ण न बाळगणाऱ्या बेजबाबदार लोकांचा सहभाग आहे.महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. ह्यमिशन बिगीन अगेनह्ण जरी सुरू असले तरीदेखील लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविला गेला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही संध्याकाळी ७ वाजेनंतर बाहेर विनाकारण पडण्यावर तसेच व्यवसायाबाबतही निर्बंध जाहीर केले आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी व संचारबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आदेश पारित केले आहे.पोलीस आयुक्तालयाकडून शहरात चोखपणे 'नाइट कर्फ्यू'ची अंमलबजावणी करण्याचे आदेश मंगळवारीच (दि.३०) देण्यात आले. बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपासून सर्वच पोलीस ठाणे हद्दीत गस्तीपथकाद्वारे व्यावसायिकांनाही सुचना देण्यात आल्या व नाकाबंदी पॉइंट सक्रीय करत दुचाकीस्वारांकडे चौकशी करण्यात आली. यावेळी अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना तत्काळ मार्गस्थ करून देण्यात आले; मात्र विनाकारण रस्त्यावर प्रवास करण्यासाठी उतरलेल्या दुचाकीचालकांचे पहिल्या दिवशी समुपदेशन करून ताकीद देत सोडण्यात आले; मात्र ज्या दुचाकीचालकांनी मास्क परिधान केलेला नव्हता किंवा एकापेक्षा अधिक प्रवाशी बसविलेले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस