कळवण नगरपंचायतीकडून पाच वर्षांत पन्नास कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:44 IST2021-01-27T21:16:59+5:302021-01-28T00:44:18+5:30
कळवण : कळवणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात नगरपंचायतच्या सत्तेची सूत्रे दिली. त्यामुळे गेल्या ५ वर्षांत ५० कोटी रुपयांची सार्वजनिक विकासकामे पूर्ण करण्यात यश आले. यापुढेही कळवण शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार नितीन पवार यांनी दिली.

कळवण नगरपंचायतीच्या ह्यलोकाभिमुख कार्याची वचनपूर्तीह्ण पुस्तक प्रकाशनप्रसंगी आमदार नितीन पवार, नगराध्यक्षा रोहिणी महाले, कौतिक पगार, ॲड. शशिकांत पवार, बेबीलाल संचेती, बाबुलाल पगार, देवराम पगार, धनंजय पवार, अशोक पवार, नारायण हिरे, कारभारी आहेर, राजेंद्र भामरे, महेंद्र हिरे अंबादास जाधव, मधुकर पगार आदीसह पदाधिकारी.
कळवण : कळवणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात नगरपंचायतच्या सत्तेची सूत्रे दिली. त्यामुळे गेल्या ५ वर्षांत ५० कोटी रुपयांची सार्वजनिक विकासकामे पूर्ण करण्यात यश आले. यापुढेही कळवण शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार नितीन पवार यांनी दिली.
नगरपंचायतच्या माध्यमातून कळवण शहरातील ५ वर्षांच्या लोकाभिमुख कार्याची वचनपूर्ती दर्शविणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते व नगराध्यक्षा रोहिणी महाले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी आमदार नितीन पवार यांनी सांगितले, गेल्या ५ वर्षांत सार्वजनिक विकासकामांना प्रथम प्राधान्य दिले, त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यात यश आले. शहरातील भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणीपुरवठा योजना, नगरपंचायत प्रशासकीय इमारत, शहरांतर्गत भूमिगत वीजवाहिनी योजना, अग्निशमन वाहन, बगीचा यासह अंतर्गत रस्ते आदी कामे शासनस्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, काही कामांना मंजुरी मिळाली असल्याचेही आमदार पवार यांनी सांगितले. शिवाय कळवण परिसरातील सिंचनासाठी गिरणा नदीवर बंधारे बांधणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, कळवण शिक्षण संस्थेचे सरचिटणीस बेबीलाल संचेती, कमको संचालक प्रा. निंबा कोठावदे, योगेश मालपुरे, ज्येष्ठ नेते कारभारी पगार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार काशीनाथ बहिरम, गटनेते कौतिक पगार धनंजय पवार, अशोक पवार, नारायण हिरे, कारभारी आहेर,बाबुलाल पगार, देवराम पगार, ॲड. परशुराम पगार, डॉ. पोपट पगार, राजेंद्र भामरे, महेंद्र हिरे आदींसह मान्यवर उपस्थित होते, सूत्रसंचालन व प्रास्ताविक राकेश हिरे यांनी केले तर आभार राजेंद्र भामरे यांनी मानले.
पहाटेच्या शपथविधीचे किस्से
आमदार नितीन पवार यांनी यावेळी आपल्या भाषणात फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या सोहळ्याचे खुमासदार किस्से सांगत उपस्थितांना पोटधरून हसविले. याचवेळी कळवण नगरपंचायतच्या माध्यमातून विकासकामांच्या निमित्ताने स्व. ए. टी. पवार यांची आठवण झाल्याचे सांगून त्यांना काही काळ गहिवरून आले.