शहरात स्वाइन फ्लूचा पाचवा बळी
By Admin | Updated: February 22, 2015 00:39 IST2015-02-22T00:39:12+5:302015-02-22T00:39:46+5:30
शहरात स्वाइन फ्लूचा पाचवा बळी

शहरात स्वाइन फ्लूचा पाचवा बळी
नाशिक : स्वाइन फ्लू या आजाराची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ बी़ आऱ गायकवाड यांनी दिली़ स्वाइन फ्लूने आतापर्यंत चार बळी घेतले असून, या रोगाचे पाचवे बळी श्यामसुंदर मच्ंिछद्र शेलार (४८) हे ठरले असून, ते मालेगाव तालुक्यातील येसगावचे रहिवासी आहेत़ मुंबई नाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते़ उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, शनिवारी महापालिकेच्या कथडा रुग्णालयात एक व जिल्हा रुग्णालयात चार स्वाइन फ्लू संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत़ (प्रतिनिधी)