पंधरा हजार विद्यार्थ्यांचे गुण गायब
By Admin | Updated: July 22, 2015 00:39 IST2015-07-22T00:38:55+5:302015-07-22T00:39:41+5:30
पंधरा हजार विद्यार्थ्यांचे गुण गायब

पंधरा हजार विद्यार्थ्यांचे गुण गायब
नाशिक : ‘डिजिटल युनिव्हर्सिटी’चे स्वप्न पाहणाऱ्या मुक्त विद्यापीठाचा संगणकीय कामकाजाचा घोळ अद्यापही सुरूच असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांचे गुण निकालपत्रातून गायब झाल्याने विद्यापीठाची चांगलीच धावपळ उडाली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संबंधित विभागास जबाबदार धरण्याऐवजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांवरच खापर फोडले आहे.
मुक्त विद्यापीठाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी विद्यापीठाचे कामकाज संगणकीय करण्याची घोषणा करीत सर्व प्रकारची प्रवेशप्रक्रिया आणि परीक्षा अर्जप्रक्रिया आॅनलाइन केली. त्यांचा हा पहिलाच प्रयोग फसला आणि त्यांना प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलावी लागली होती. सर्व्हर डाउन झाल्यामुळे तर एमबीएची प्रवेशप्रकियाच रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. असे असतानाच विद्यापीठाच्या संगणकीय कामकाजाच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत.
विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या सुमारे १५३ अभ्यासक्रमाच्या निकालात सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत त्रुटी आढळून आल्या आहेत. विद्यार्थी परीक्षेस हजर असतानाही त्यास गैरहजर, तर काहींना शून्य गुण देण्यात आले आहे. बी.ए., बी.कॉम. शाखेच्या विद्यार्थ्यांना या चुकीचा सर्वाधिक फटका बसला आहे. विद्यार्थ्यांच्या हाती जेव्हा गुणपत्रिका मिळाल्या तेव्हा त्यांना काही विषयात चक्क शून्य गुण दर्शविण्यात आल्याचे निदर्शनास आले. बी.ए., बी.कॉम. विद्यार्थ्यांपासून ते व्यवस्थान अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांपर्यंतच्या गुणपत्रिकेतील गुणांत हा घोळ झाला आहे.
संगणकीय फिडिंग करताना चूक झाली असल्याचे स्पष्टपणे दिसत असतानाही विद्यापीठाने विद्यार्थ्यांवरच खापर फोडले आहे. ऐनवेळी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमुळेच असा घोळ झाल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. वास्तविक अशा विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असताना पंधरा ते सोळा हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत चुका कशा होऊ शकतात? असा प्रश्न निर्माण होता. शिवाय चुकीच्या निकालपत्रामुळे विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना विद्यापीठात चकरा माराव्या लागल्यामुळे त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागला.
राज्यभरातून जेव्हा चुकीच्या निकालपत्राबाबत तक्रारी आल्या तेव्हा विद्यापीठाने आपली चूक कबूल करीत येत्या २८ तारखेपर्यंत निकालपत्रात दुरुस्ती करण्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी विद्यापीठाने १४ तारखेपर्यंत दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तक्रारी वाढतच असल्याने आता २८ जुलैपर्यंत दुरुस्ती करून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)नाशिक : ‘डिजिटल युनिव्हर्सिटी’चे स्वप्न पाहणाऱ्या मुक्त विद्यापीठाचा संगणकीय कामकाजाचा घोळ अद्यापही सुरूच असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांचे गुण निकालपत्रातून गायब झाल्याने विद्यापीठाची चांगलीच धावपळ उडाली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संबंधित विभागास जबाबदार धरण्याऐवजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांवरच खापर फोडले आहे.
मुक्त विद्यापीठाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी विद्यापीठाचे कामकाज संगणकीय करण्याची घोषणा करीत सर्व प्रकारची प्रवेशप्रक्रिया आणि परीक्षा अर्जप्रक्रिया आॅनलाइन केली. त्यांचा हा पहिलाच प्रयोग फसला आणि त्यांना प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलावी लागली होती. सर्व्हर डाउन झाल्यामुळे तर एमबीएची प्रवेशप्रकियाच रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. असे असतानाच विद्यापीठाच्या संगणकीय कामकाजाच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत.
विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या सुमारे १५३ अभ्यासक्रमाच्या निकालात सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत त्रुटी आढळून आल्या आहेत. विद्यार्थी परीक्षेस हजर असतानाही त्यास गैरहजर, तर काहींना शून्य गुण देण्यात आले आहे. बी.ए., बी.कॉम. शाखेच्या विद्यार्थ्यांना या चुकीचा सर्वाधिक फटका बसला आहे. विद्यार्थ्यांच्या हाती जेव्हा गुणपत्रिका मिळाल्या तेव्हा त्यांना काही विषयात चक्क शून्य गुण दर्शविण्यात आल्याचे निदर्शनास आले. बी.ए., बी.कॉम. विद्यार्थ्यांपासून ते व्यवस्थान अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांपर्यंतच्या गुणपत्रिकेतील गुणांत हा घोळ झाला आहे.
संगणकीय फिडिंग करताना चूक झाली असल्याचे स्पष्टपणे दिसत असतानाही विद्यापीठाने विद्यार्थ्यांवरच खापर फोडले आहे. ऐनवेळी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमुळेच असा घोळ झाल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. वास्तविक अशा विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असताना पंधरा ते सोळा हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत चुका कशा होऊ शकतात? असा प्रश्न निर्माण होता. शिवाय चुकीच्या निकालपत्रामुळे विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना विद्यापीठात चकरा माराव्या लागल्यामुळे त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागला.
राज्यभरातून जेव्हा चुकीच्या निकालपत्राबाबत तक्रारी आल्या तेव्हा विद्यापीठाने आपली चूक कबूल करीत येत्या २८ तारखेपर्यंत निकालपत्रात दुरुस्ती करण्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी विद्यापीठाने १४ तारखेपर्यंत दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तक्रारी वाढतच असल्याने आता २८ जुलैपर्यंत दुरुस्ती करून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)