शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दुचाकीला लाथ मारून लांबविले पावणेदहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 11:23 PM

नाशिक : कुरियरचे कार्यालय बंद झाल्यानंतर ग्राहकांसाठी वाटप करायची ९ लाख ७४ हजार रुपयांची रोकड घरी घेऊन जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रितम हरिभाऊ बागडे (३०, रा.गेंदालाल मिल, जळगाव) याच्या दुचाकीला लाथ मारुन रोकड असलेली बॅग लांबविल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजता जळगाव येथे घडली. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांकडून कमालीची गोपनीयता पाळली जात होती.

ठळक मुद्देजळगाव येथील घटना : कुरियरची होती रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कुरियरचे कार्यालय बंद झाल्यानंतर ग्राहकांसाठी वाटप करायची ९ लाख ७४ हजार रुपयांची रोकड घरी घेऊन जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रितम हरिभाऊ बागडे (३०, रा.गेंदालाल मिल, जळगाव) याच्या दुचाकीला लाथ मारुन रोकड असलेली बॅग लांबविल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजता जळगाव येथे घडली. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांकडून कमालीची गोपनीयता पाळली जात होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम बागडे हा तरुण संत गोदडीवाला मार्केटमध्ये असलेल्या ‘क्विक कुरियर’ या फर्ममध्ये कामाला आहे. जितेंद्र सोमानी यांच्या मालकीची ही फर्म आहे. कुरियरचे काम असल्याने रोज ग्राहकांच्या पैशांची आवक जावक असते. सोमवारी कार्यालय बंद करण्यापूर्वी मालक सोमानी यांनी प्रितम याच्याकडे ९ लाख ७४ हजार रुपये दिले. ही रक्कम मंगळवारी ग्राहकांना वाटप करायची होती. प्रितम हा नेहमीच घरी जाताना बॅगमध्ये रक्कम टाकून नेत असायचा. त्याप्रमाणे सोमवारी कार्यालयातून दुचाकीने शनी पेठमार्गे निघाल्यानंतर प्रजापत नगर व शिवाजी नगराला लागून असलेल्या स्मशानभूमीजवळ दुचाकीवरून मागून दोन जण आले. त्यांनी प्रितमला थांबवून त्याच्याशी वाद घालून शिवीगाळ केली तर दुसऱ्याने त्याच्या दुचाकीला लाथ मारून रोकड असलेली बॅग घेऊन पलायन केले. घाबरलेल्या प्रितम याने आरडाओरड करून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही उपयोग झाला नाही.सीसीटीव्ही फुटेजमध्येही काही दिसेनाया घटनेनंतर प्रितम याने शहर पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच त्याला घेऊन घटनास्थळ गाठले. परिसरात चौकशी करून एका शोरुममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र तेथे काहीच दिसले नाही. प्रितम ज्या मार्गाने घरी गेला, त्यामार्गावरील दुकान व घरांचे सीसीटीव्ही तपासण्याचे काम रात्री १० वाजेपर्यंत सुरूहोते, परंतु काहीच हाती लागले नाही. शेवटी त्याला परत पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संशयितांचे वर्णन विचारुन माहिती काढली जात होती.पोलिसांकडून माहिती देण्यास नकारया घटनेविषयी शहर पोलिसांना माहिती विचारली असता त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला. पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनीही गुन्हे शोध पथक चौकशी करीत आहेत, त्यात सत्यता किती, कुरियर चालकांकडे इतकी रक्कम कशी हा देखील चौकशीचा भाग असल्याचे सांंगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस