रात्रपाळीची साफसफाई बंद करण्यास तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:21 IST2017-08-19T00:21:35+5:302017-08-19T00:21:56+5:30
महापालिकेकडून सध्या कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांमार्फत रात्रपाळीची साफसफाई करून घेतली जात आहे. परंतु, मनपातील काही व्यक्ती ठेकेदारांना लाभ होण्यासाठी रात्रपाळीची सफाई बंद करण्याच्या प्रयत्नात असून त्यास वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. समितीने त्याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.

रात्रपाळीची साफसफाई बंद करण्यास तीव्र विरोध
नाशिक : महापालिकेकडून सध्या कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांमार्फत रात्रपाळीची साफसफाई करून घेतली जात आहे. परंतु, मनपातील काही व्यक्ती ठेकेदारांना लाभ होण्यासाठी रात्रपाळीची सफाई बंद करण्याच्या प्रयत्नात असून त्यास वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. समितीने त्याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, मनपाच्या आरोग्य विभागामार्फत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांकडून पाच हजार रुपये वेतनावर रात्रपाळीची साफसफाई करून घेतली जात आहे. मात्र, हीच कामे ठेकेदारांकडून करून घेतल्यास त्यांच्या कामगारांना किमान वेतनानुसार सुमारे १५ हजार रुपये मोजावे लागतील. त्यामुळे मनपाच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा ताण पडेल. मनपातील काही लोक ठेकेदारांना लाभ होण्यासाठी मनपाचे आर्थिक नुकसान करत आहेत. महापालिकेत कामगारांची संख्या अपुरी असल्याने प्रशासनाकडून सोयीनुसार रात्रपाळीत काम करून घेतले जात आहे. त्यात आणखी भर घालण्याऐवजी काही लोकांना ठेका देण्यासाठी मनपाच्या कर्मचाºयांमार्फत होणारी रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यास समितीचा तीव्र विरोध आहे. आउटसोर्सिंगद्वारे कर्मचारी भरतीला समितीने यापूर्वीही कडाडून विरोध दर्शविलेला आहे. सफाई कामगारांच्या भरतीसंबंधीचा प्रस्ताव महासभेने मंजूर करूनही तो शासनाकडे अद्याप प्रलंबित आहे. शासनाने मनपाकडून अभिप्राय मागविला आहे, परंतु सदर अभिप्राय अद्याप पाठविण्यात आला नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. आयुक्तांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी सुरेश दलोड, सुरेश मारू, रणजित कल्याणी, ताराचंद पवार, रमेश मकवाना, अनिल बेग आदी उपस्थित होते.