शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारची नऊ मुलांना धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:58 IST

कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या नऊ मुलांना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१४) पहाटेच्या सुमारास साईनाथनगर चौफुलीजवळ घडली़ विशाल नामदेव पवार (११, रा़ वडाळागाव, कोळीवाडा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, दोघा गंभीर जखमींपैकी एकावर खासगी रुग्णालयात तर दुसऱ्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़

ठळक मुद्देसाईनाथनगर चौक : कालिकेच्या दर्शनासाठी जात असताना घडली घटना

इंदिरानगर : कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या नऊ मुलांना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१४) पहाटेच्या सुमारास साईनाथनगर चौफुलीजवळ घडली़ विशाल नामदेव पवार (११, रा़ वडाळागाव, कोळीवाडा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, दोघा गंभीर जखमींपैकी एकावर खासगी रुग्णालयात तर दुसऱ्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ या अपघाताची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, फरार कारचालकाचा शोध सुरू आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळागावातील कोळीवाडा येथील १० ते १५ वयोगटातील अल्पवयीन मुले पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जात होते़ साईनाथनगर चौफुलीजवळून ही मुले जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या लाल रंगाच्या कारने या मुलांना जोराची धडक दिली़ या धडकेमध्ये विशाल नामदेव पवार (११), साहिल खंडू कडाळे (१४), रोहन बापू मोरे (१२), कृष्णा दत्तू खोडे (९), राहुल बापू मोरे (१५), अश्विन दत्तू खोडे (१४), ऋषिकेश सुनील वाघ (१०), तुषार गोविंद खाडम (१५) हे जखमी झाले़ यापैकी गंभीर जखमी असलेल्या विशाल पवारचा मृत्यू झाला तर तुषार खाडम याच्यावर खासगी रुग्णालयात तर कृष्णा खोडे व इतर जखमींवर जिल्हा रुग्णाालयात उपचार सुरू आहेत़या अपघातानंतर कारचालक फरार झाला तर पहाटेची वेळ असल्याने जखमी मुलांना मदत मिळण्यास उशीर झाला़ मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाच्या वाहनात काही जखमी मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे वडाळागाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़दोघांना दुचाकीवरून रुग्णालयात हलविलेरुग्णवाहिका अखेरपर्यंत आलीच नाहीपहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास अपघात घडला. साडेतीन वाजेपर्यंत सर्व जखमी मुले रस्त्यावरच पडून होती. पोलिसांची गाडी घटनास्थळी आली आणि त्यांनी नातेवाइकांना रुग्णवाहिका येत असल्याचे सांगितले, मात्र अखेरपर्यंत रुग्णवाहिका तेथे पोहचलीच नाही. नातेवाइकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी पोलिसांना विनवणी करत जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी चार जखमी मुलांना वाहनातून रुग्णालयात दाखल केले तर उर्वरित तिघांना नातेवाइकांनी दुचाकीवरून रुग्णालयात हलविले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू