‘त्यांचे’ मन वळविण्यात काही अंशी यश

By Admin | Updated: January 30, 2017 00:42 IST2017-01-30T00:41:55+5:302017-01-30T00:42:20+5:30

‘त्यांचे’ मन वळविण्यात काही अंशी यश

A few partial achievement of 'their' | ‘त्यांचे’ मन वळविण्यात काही अंशी यश

‘त्यांचे’ मन वळविण्यात काही अंशी यश

शफीक शेख : मालेगाव
अमेरिकेतील कॅलिफोनिर्यातून तब्बल २२ तासांचा प्रवास करून मालेगावी बालकांना पोलिओचे डोस देण्यास नकार देणाऱ्या कुटुंबांचे मतपरिवर्तन करण्यासाठी आलो, त्यात काहीअंशी यशही आले; मात्र उच्चशिक्षित शिक्षकाला पटवूनही त्याने आपल्या मुलास पोलिओचा डोस देण्यास नकार दिल्याने आश्चर्य वाटल्याचे अमेरिकेतील रोटरीयन पथकातील सदस्य स्टीव्ह झेबर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.स्टीव्ह झेबर म्हणाले, नकारार्थी कुटुंबाचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी ‘नकार’ कायम ठेवला. वास्तविक शिक्षक असलेल्या मुलाच्या पालकाशी चांगले संभाषण झाले. त्याने समजूनही घेतले. अनेक विषयांवर त्यांच्याशी बोलूनही त्याची ‘भूमिका’ बदलली नाही. झेबर म्हणाले, झेबर म्हणाले, मी रोटरीत रूजू झालो त्यावेळी जगात ३ लाख ५० हजार पोलिओचे रूग्ण होते. गेल्यावर्षी पोलिओचे ३७ रूग्ण होते. सदर शिक्षकाला सांगितले की, संपूर्ण जगात ही पोलिओची ‘लस’ मिळत नाही. मी माझ्या मुलाची ‘रिस्क’ घेतो, असे तो म्हणाला. बाकी इतर लोक सभ्य वाटले. तरीही काही जण आपल्या भूमिकेशी ठाम होते. झेबर यांना समाजकार्यासाठी पत्नीचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. झेबर यांचा मुलगा संगीत शिक्षक आहे तर मुलगी कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये काम करते. भाषेची समस्या त्यांना काही प्रमाणात जाणवली; परंतु स्थानिक रोटेरियन डॉ. दिलीप भावसार यांचे सहकार्य लाभले. सकाळी ९ वाजता मोहिमेवर निघून दीड वाजता परत आलो.
मालेगावात मुले आणि पालक यांचे संबंध अतिशय दृढ असल्याचे दिसून आल्याचे सांगत झेबर म्हणाले, पूर्वी मी मुंबई, राजस्थान, उदयपूर येथे येऊन गेलो होतो. दोन कुटुंबांना भेटून तर मला कमालीची भीती वाटल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर मी शहरातील भुईकोट किल्ला पाहिला. त्यानंतर यंत्रमाग बघितले. यंत्रमागांच्या ‘घरघर’चा अनुभव वेगळा होता. आम्ही इतक्या लांबून येऊनही लोक त्यांची मानसिकता बदलत नसल्याचे पाहून मन सुन्न झाल्याचे झेबर यांनी शेवटी सांगितले.
मालेगावात प्रथमच आले. लोकांनी पाहुण्यासारखं उत्स्फुर्त स्वागतही केल. लहान मुलांना घरोघर जाऊन पोलिओचे डोसही दिले. त्यांच्या पालकांशी चर्चा केली. पोलिओचे डोस घेण्यास नकार देणाऱ्या पाच कुटुंबापैकी चार कुटुंबांचे मन वळविण्यात यश आल्याचे अमेरिकन पथकातील श्रीमती मार्ग कोल यांनी सांगितले. मार्ग कोल म्हणाल्या, एका घरात मुलाचे वडील नव्हते. बाळाच्या आईने सांगितले. त्यांच्या वडीलांशी चर्चा करून उद्या पोलिओचा डोस मुलाला देईन. मी देखील यंत्रमाग बघितले. विशेष म्हणजे शहरात लोक अतिशय दाटीवाटीने राहत असल्याने आश्चर्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. काही बुरखाधारी महिला धावत आल्या. त्यांनी मोबाईलवर आमच्याबरोबर फोटोही काढले. २१ वर्षापासून मी ‘रोटरी’त काम करतेय. दक्षिण आफ्रिका, केनिया, टांझानिया, युगांडा, साऊथ आफ्रिका येथे दौरे केले. त्यावेळी मी हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करीत होते, असे श्रीमती मार्ग कोल यांनी सांगितले. तामिळनाडूतही कोल येऊन गेल्या असून त्या पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी निधी मिळविण्याचे काम करतात. आता येथून परतताना वेरूळ, अजिंठा, ताजमहाल पाहून बनारस येथे ‘गंगा’ पाहण्यास जाणार असल्याचे शेवटी श्रीमती मार्ग कोल यांनी सांगितले.

Web Title: A few partial achievement of 'their'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.