फेब्रुवारीअखेर खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित
By Admin | Updated: January 3, 2017 01:01 IST2017-01-03T01:01:28+5:302017-01-03T01:01:40+5:30
आयुक्तांची स्पष्टोक्ती : हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू

फेब्रुवारीअखेर खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित
नाशिक : महापालिकेने पुणे येथील मेलहॅम आणि फ्रान्स येथील आयकॉस यांनी संयुक्तरीत्या स्थापन केलेल्या कंपनीला तीस वर्षांच्या कराराने खतप्रकल्प चालविण्यासाठी देण्याबाबतची हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असून, फेब्रुवारी २०१७ अखेर खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. खतप्रकल्पासंबंधी स्थायीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित झाला असता आयुक्तांनी सांगितले, खतप्रकल्पासाठी संबंधित संस्थांनी ‘नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड’ ही स्पेशल परपज व्हेईकल कंपनी स्थापन केलेली आहे, त्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाचे संचलन होणार आहे. सदर कंपनीकडे खतप्रकल्प हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.