राजापूर येथे आगीत चारा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:35 IST2019-01-30T23:34:34+5:302019-01-30T23:35:02+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी नथू काशीनाथ अलगट यांच्या घराजवळील चाऱ्याला अचानक आग लागल्याने या आगीत सुमारे ४५ हजार रुपयांचा चारा जळून खाक झाला आहे.

आग विझविण्याच्या प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे जवान व ग्रामस्थ.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी नथू काशीनाथ अलगट यांच्या घराजवळील चाऱ्याला अचानक आग लागल्याने या आगीत सुमारे ४५ हजार रुपयांचा चारा जळून खाक झाला आहे.
आगीने रौद्र रूप धारण केल्याने माजी सरपंच प्रमोद बोडखे यांनी फोन करून अग्निशामक दलास बोलाविले. अग्निशमन दलाचा बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाला. दुष्काळी परिस्थिती असल्याने आग विझविण्यासाठी पाणी मिळाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत नुकसान झाल्याने तसेच शेतकºयाकडे जनावरांसाठी चारा शिल्लक नसल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या आगीत सुमारे ४५ हजारांचे नुकसान झाले असून, तलाठी रोखले यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.